माय बापहो, लेकरं सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 02:46 AM2017-01-19T02:46:18+5:302017-01-19T02:46:18+5:30

शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भरकटलेल्या पाऊलवाटा.

My parents, take care of them! | माय बापहो, लेकरं सांभाळा !

माय बापहो, लेकरं सांभाळा !

Next

संजय खांडेकर
अकोला, दि. १८- प्रेम करणे गुन्हा नाही; परंतु अभ्यास करून भविष्य घडविण्याच्या वयात अभ्यास सोडून एकांत शोधण्याचे प्रमाण महाविद्यालयीन युवकांसह अगदी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. शहराजवळील निर्माणधिन असलेल्या वसाहतीत, शहराबाहेरच्या झाडाझुडुपात अश्लील चाळे करीत बसणे,असे प्रमाण वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे अनेकदा सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगसारख्या जीवघेण्या घटनांचाही जन्म होतो. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या या बेताल वर्तणुकीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. अशा घटनांचा वेध घेण्यासाठी ह्यलोकमतह्णने शहराजवळच्या निर्माणधिन असलेल्या वसाहतीत आणि निर्मनुष्य असलेल्या परिसरात भेटी देऊन पाहणी केली. काही हादरविणारी चित्रे कॅमेराबद्ध केली. अत्यंत किळसवाणे चित्र पाहण्यास मिळाले.त्यातील काही प्रातिनिधीक छायाचित्र प्रकाशित केली आहेत.
शाळा-महाविद्यालयाच्या नावाने घरून निघालेली, नुकताच वयात आलेली मुलं खरंच शाळा-महाविद्यालयात जातात का, की नको ते उद्योग करतात. हे पाहण्याची वेळ आता अकोल्यातील पालकांवर आली आहे. मैत्रीच्या माध्यमातून मोबाइल, व्हॉट्सअँपवर झालेली जवळीकता मुलांना नंतर शारीरिक आकर्षणाकडे ओढून नेते. मग, हव्याशा वाटणार्‍या सहवासाने एकांतवासाच्या शोधात ही मैत्री पुढे जाते, कळत नकळत भरकटलेल्या पाऊलवाटा नको त्या वयात नको ते करायला लावतात. अकोला शहरालगत असलेल्या एकांतवासातील वसाहती, पडक्या इमारती, बागा, झुडुपे, नाल्यांचा उपयोग ही मंडळी घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. अकोला शहराबाहेर असलेल्या एकांतवासातील वसाहती आणि झाडा-झुडुपातील परिसर शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांच्या स्वैराचाराचे अक्षरश: कुरण झाले आहे.व्याळा मार्गावरील नरहर शेट्टीवार यांच्या गजानन नगरी परिसरात, त्या बाजूच्या अन्नपूर्णा नगरी परिसरात, जाजू नगरीच्या पलीकडील नाल्यात, गायगाव मार्गावरील रेल्वे लाइनवर, पातूर मार्गावर, मलकापूरकडून निघणार्‍या औद्योगिक वसाहत परिसरात, विमानतळाच्या भोवती, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या आतील परिसरात, शाळा-महाविद्यालयीन किशोरवयीन मुले अश्लील चाळे करताना आढळतात. बीभत्स आणि तेवढीच अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती ह्यलोकमतह्णने कॅमेराबंद केली आहे. उपरोक्त ठिकाणी वसाहती भोवती फारशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने जवळपास वाहने ठेवून ही मंडळी शिरकाव करते. वसाहतींचे मालक आणि शहरातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चुप्पी साधली आहे.

शाळा-महाविद्यालयांच्या वेळातच वावर
शाळा-महाविद्यालयांच्या नावे घरून निघालेली मुले नेमक्या शाळा-महाविद्यालयाच्या तासिका वेळात शहरालगत असलेल्या एकांतवासात वावरतात. जर मुले शाळा-महाविद्यालयात नसतील, तर पालकांनी आपल्या पाल्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

कृषी विद्यापीठ परिसरात मुक्त संचार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर दूरपर्यंत विस्तारलेला आहे. प्रशासकीय इमारतीच्या लगत निघणार्‍या पाऊलवाटेने बांबूंचे वन लागते. कालवाजवळ असलेल्या या बांबू वनात पडलेले आक्षेपार्ह साहित्य मुक्त संचार असल्याच्या खाणाखुणा देतात.

जाणीव आहे आम्हाला..
आपलं बाळ रडलं तरी आपण अस्वस्थ होतो. त्याला ठेच लागू नये, त्याचं पाऊल वाकडं पडू नये, हे प्रत्येक पालकाला वाटते.
कधीकाळी बोट धरून शिकविलेली मुलं भरकटली तर. अनेक संकटे ओढविल्या जाण्याची शक्यता आहे. आपल्या पाल्यांना वेळीच हात देण्यासाठी, त्यांना सावरण्यासाठी .. आपण वेळीच जागरूक व्हावे, त्यासाठीच हा खटाटोप.

Web Title: My parents, take care of them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.