वीज चोरीप्रकरणी मायलेकास सश्रम कारावास
By admin | Published: April 28, 2017 01:55 AM2017-04-28T01:55:22+5:302017-04-28T01:55:22+5:30
अकोला: वीज चोरी केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी मायलेकांना तीन वर्षे सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
अकोला: कारखान्यातील वीज मीटरमध्ये फेरफार करून ३२ हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी मायलेकांना तीन वर्षे सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
विद्युत मंडळाचे तत्कालिन कनिष्ठ अभियंता हरिशकुमार गिरीधारीलाल मिठ्ठाणी(५७) यांच्या तक्रारीनुसार, मोहम्मद अली रोडवरील साजेदा बी शेख छोटू मन्सुरी(७0) आणि शेख आबीर शेख छोटू(३0) यांनी ७ डिसेंबर २00१ पूर्वी त्यांच्या जुने शहरातील भगतवाडी येथील कारखान्यातील वीज मीटरमध्ये छीद्र पाडून मीटर बंद केले आणि ३२ हजार रुपयांची वीज चोरी केली. त्यानुसार, डाबकी रोड पोलिसांनी भारतीय विद्युत अधिनियम ३९, ४0 नुसार गुन्हा दाखल केला.
मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मायलेकांना तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.