चतारी ग्रामीण रुग्णालयातून व्हॅक्सिन चोरी प्रकरणात गुढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:11 AM2021-02-19T04:11:49+5:302021-02-19T04:11:49+5:30

खेट्री : पातुर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक सात व्हॅक्सिन चोरी प्रकरणात गूढ कायम असून, चान्नी ...

Mystery remains in the case of vaccine theft from Chatari Rural Hospital | चतारी ग्रामीण रुग्णालयातून व्हॅक्सिन चोरी प्रकरणात गुढ कायम

चतारी ग्रामीण रुग्णालयातून व्हॅक्सिन चोरी प्रकरणात गुढ कायम

Next

खेट्री : पातुर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक सात व्हॅक्सिन चोरी प्रकरणात गूढ कायम असून, चान्नी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयातील ८ ते १० आरोग्य कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदून १७ फेब्रुवारी रोजीच्या रात्री उशिरापर्यंत चौकशी केली, येथील ग्रामीण रुग्णालयातून १२ फेब्रुवारी रोजी कोरोना व्हॅक्सिनच्या ७ कुप्पया लंपास झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अधिकारी व कर्मचारी यांचा एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु वस्तुसि्थती समाेर आलेली नाही दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांनी तत्काळ रुग्णालय गाठले आणि चौकशीला सुरुवात केली,असून १७ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत ८ ते १० आरोग्य कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहे

Web Title: Mystery remains in the case of vaccine theft from Chatari Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.