तेल्हारा येथे नाफेडची खरेदी पुन्हा सुरू
By Admin | Published: March 4, 2017 02:40 AM2017-03-04T02:40:36+5:302017-03-04T02:40:36+5:30
एकाच दिवशी ६00 क्विंटल तुरीचे मोजमाप
तेल्हारा (जि. अकोला), दि. ३- तेल्हारा येथे नाफेडची तूर खरेदी केंद्र सुरू होऊन एक महिना उलटला. यादरम्यान मोजमापावरून दोनवेळा खरेदी बंद झाली होती. ३ मार्च रोजी पुन्हा मोजमाप सुरू होऊन एकाच दिवशी ६00 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तेल्हार्यातील नाफेड खरेदी विविध कारणांवरून अडचणीची ठरत आहे. खरेदी सुरू झाली तेव्हापासून शेतकर्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एकप्रकारे डोकेदुखी ठरत आहे. बाजार समिती यार्डात शेतकर्यांचा माल एक महिन्यापासून पडून आहे. दरम्यान व्यापार्यांचा हस्तक्षेप वाढून शेतकर्यांच्या तक्रारीवरून खरेदी बंद झाली होती. याच प्रकरणावरून बाजार समितीची सभासुद्धा वादळी ठरली होती. शेतकर्यांनी केलेल्या तक्रारीनुसार व्यापारी संचालकांविरुद्ध कारवाईची मागणी झाली; परंतु अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. २ मार्चला बंद झालेली खरेदी ३ मार्चपासून पुन्हा सुरू करण्यात आली. तूर खरेदी करताना शेतकर्यांच्या मालाचे डुकरांकडून व चोर्यांमुळे नुकसान होते. याकडे बाजार समिती काहीच लक्ष देत नाही. एक महिन्यापासून पडून असलेल्या मालाचे मोजमाप होत नव्हते. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे.