नाफेडच्या मका विक्रीचे चुकारे रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:54 AM2020-09-30T09:54:00+5:302020-09-30T09:54:14+5:30
तालुक्यातील ३९ शेतकºयांच्या मका खरेदीचे २ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे.
तेल्हारा: तालुक्यात यावर्षी प्रथमच नाफेड अंतर्गत मका खरेदी करण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेत मका न विकता, नाफेडला विकला; परंतु चार ते पाच महिने उलटूनही शेतकऱ्यांना मका विक्रीचे चुकारे मिळाले नाहीत. तालुक्यातील ३९ शेतकºयांच्या मका खरेदीचे २ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे.
तालुक्यातील ३९ शेतकºयांनी चांगला दर मिळेल. या आशेने नाफेडच्या तेल्हारा केंद्रावर मका विकला; परंतु शेतकºयांना मालाच्या पैशांसाठी संबंधित कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तेल्हारा तालुक्यात यावर्षी बºयाच शेतकºयांनी मका पिकाचे उत्पादन घेतले. काही शेतकºयांनी व्यापाºयांना तर काही शेतकºयांनी नाफेड योजने अंतर्गत आॅनलाइन नोंदणी करून खरेदी केंद्रावर मका विकला. अनेक महिने उलटले तरी, शेतकºयांना रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संबंधित कार्यालयात चकरा मारत आहेत. तालुक्यातील ३९ शेतकºयांचे २ कोटी ६४ लाख ८८00 रुपये रक्कम रखडली आहे. आधीच शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामातील पिकांचेसुद्धा परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील पीक नियोजन व वाढता खर्च पाहता शेतकºयांना त्यांची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नाफेड खरेदी योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी करून मका पिकाचे मोजमाप केले. खरेदी-विक्री केंद्र येथे मका विकला; परंतु अद्यापपर्यंत मक्याची रक्कम जमा झाली नाही. आर्थिक अडचणीचा विचार करून शेतकºयांना तातडीने रक्कम द्यावी.
-सुधीर साखरे, शेतकरी.