तेल्हारा येथे ‘नाफेड’ची हरभरा खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:39+5:302021-03-13T04:33:39+5:30
तेल्हारा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात १० मार्च रोजी ‘नाफेड’च्या हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुहूर्तालाच दोनशे ...
तेल्हारा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात १० मार्च रोजी ‘नाफेड’च्या हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुहूर्तालाच दोनशे क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली असून, लवकरात लवकर सुरू झालेल्या नाफेडच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांना शासनाचा हमीभाव मिळावा, यासाठी नाफेडद्वारे शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला जातो. त्यानुसार तेल्हारा येथेही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हरभरा खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी पूजन केले. प्रथम आलेल्या शेतकऱ्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती व संचालक संदीप खारोडे, डॉ. ज्ञानेश्वर तराळे, शे. आरिफ शे. लतीफ, रवींद्र केला आदी संचालकासह सचिव सुरेश सोनोने उपस्थित होते. हरभऱ्याचा शासकीय भाव ५ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल असून, बाजार समितीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना आपला माल आणण्याचे संदेश पाठविले जात आहेत. खरेदी लवकरात लवकर सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महेंद्र मते, सुरेश कुकडे, शिवाजी मगर, उद्धवराव कुकडे, अमोल गडम, बापूराव तराळे, मोहन बोरसे, संतोष सोनोने, पुरुषोत्तम खाडे, विठ्ठल पाथ्रीकर उपस्थित होते.
फोटो :