नाफेडच्या जाचक अटी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:54 PM2019-11-13T13:54:26+5:302019-11-13T13:54:31+5:30
पण आतापर्यंत ‘नाफेड’मार्फत सोयाबीनची खरेदी झाली नसल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सध्या जादा भाव देणाºया नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे डोकेदुखी ठरणाºया जाचक अटीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत; पण आतापर्यंत ‘नाफेड’मार्फत सोयाबीनची खरेदी झाली नसल्याची माहिती आहे.
‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर हमीदराने सोयाबीन व उडिदाची खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदीच्या पहिल्या दिवशी सातही केंद्रांवर एकाही शेतकºयाने सोयाबीन व उडीद विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणला नाही. नाफेडकडून सोयाबीनला दिल्या जाणारा तोकडा भाव तसेच सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आत आद्रता असणे यासह आदी जाचक अटी सोयाबीन उत्पादकांसाठी डोकेदुखी ठरणारी असल्याने शेतकºयांनीही शासकीय खरेदीकडे पाठ दाखविल्याचे बोलले जात आहे. हमीभावाएवढेच खुल्या बाजारात दर आहेत. मूग ७०५०, उडीद ५७५०, सोयाबीन ३७१० या हमीभावाने खरेदी करण्यात येते; परंतु त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे उत्कृष्ट धान्यच शेतकºयाकडे उपलब्ध नाही, त्यातही सातबारा इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. एवढे करूनही चुकारे ऐनवेळी होत नाही, तिथे मालाची चाळणी प्रक्रियापण करावी लागते आणि चांगला माल त्याच भावाने खुल्या बाजारात जात असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे का जायचे, असा सवालही काही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
सोयाबीनला नाफेड देतेय ३,७१० भाव
च्जिल्ह्यात नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आत आद्रता यासह विविध अटींची पूर्तता होत असल्यास सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ७१० रुपये भाव दिल्या जात आहे.
व्यापाºयांकडून समाधानकारक भाव
च्शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनमध्ये सध्या १४ ते १८ टक्केपर्यंत आद्रता असल्याचे दिसून येत असले तरी सोमवारी काही ठिकाणी व्यापाºयांनी खरेदी केलेल्या सोयाबीनला ३ हजार ७५० इतका सर्वात जास्त भाव देण्यात आला आहे. नाफेडकडून दिल्या जाणाºया भावापेक्षा ४० रुपये जादा भाव मिळाल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.