नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस चार तास खोळंबली
By admin | Published: May 1, 2017 02:40 AM2017-05-01T02:40:35+5:302017-05-01T02:40:35+5:30
मूर्तिजापूर: २९ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसला मूर्तिजापूरमधील प्लॅटफॉर्म क्र.१ वर चार तासापर्यंत थांबावे लागले.
मूर्तिजापूर: नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसच्या इंजीनमध्ये २९ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदर रेल्वेगाडीला मूर्तिजापूरमधील प्लॅटफॉर्म क्र.१ वर तब्बल चार तासापर्यंत थांबावे लागले.
नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसच्या इंजीनमध्ये रविवारी रात्री काही तांत्रिक बिघाड झाल्याने सदर रेल्वेला मूर्तिजापूर रेल्वेस्थानकात तब्बल चार तासापर्यंत थांबावे लागले होते. यामुळे त्यातील प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागला. त्याच वेळी मुंबई-हावडा मेलला मेन लाइनवर घेतल्याने एक्स्प्रेसच्या प्रवाशांना खाली उतरून रेल्वेच्या डब्यांमध्ये चढावे लागले. यावेळी तहानेने व्याकूळ झालेल्या रेल्वे प्रवाशांना मूर्तिजापुरातील स्वच्छता अभियानाचे सुरेंद्र काका देशमुख, सतीश अग्रवाल, संजय पोळकट, डिगांबर भुगूल, विलास वानखडे, किशोर हिरूळकर, अमर गोडाले, सुरेंद्र देशमुख, नानासाहेब कांबे, विठ्ठल काकोडे, आमिनोद्दीन, गजानन तायडे युनूस खान इत्यादींनी थांबलेल्या नागपूर-कोल्हापूर रेल्वे गाडीच्या प्रवाशांना प्रत्येक डब्यात जाऊन पाणी पाजून तृष्णा तृप्ती केली.