नागपुरातील प्रेमी युगुल अकोला पोलिसांच्या ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:54 AM2018-01-29T01:54:06+5:302018-01-29T01:56:08+5:30

अकोला : नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने रविवारी  पकडले. त्यानंतर या प्रेमी युगुलास अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर पोलीस या प्रेमी युगूलाला घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत. 

Nagpur lover's in Akola police custody! | नागपुरातील प्रेमी युगुल अकोला पोलिसांच्या ताब्यात!

नागपुरातील प्रेमी युगुल अकोला पोलिसांच्या ताब्यात!

Next
ठळक मुद्देप्रेमी युगुल नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासीअकोट फैल पोलिसांनी प्रेमी युगुलास केले नागपूर पोलिसांच्या स्वाधिन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने रविवारी  पकडले. त्यानंतर या प्रेमी युगुलास अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर पोलीस या प्रेमी युगूलाला घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत. 
नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल अकोल्यात पळून आले होते. ही माहिती शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाला मिळाली. 
अकोट फैल परिसरातून प्रेमी युगुलास ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, ते नागपुरातून पळवून आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी नागपुरातील गिट्टी खदान पोलिसांत दिली होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला. दरम्यान, ही युवती एका युवकासोबत अकोल्यातील अकोट फैल परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने गोपनीय पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन केले. अकोट फैल पोलिसांनी या प्रेमी युगुलाची माहिती नागपूर पोलिसांना दिली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी अकोल्यात येऊन त्या जोडप्याला ताब्यात घेतले असून, नागपूर रवाना झाले आहेत. 

Web Title: Nagpur lover's in Akola police custody!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.