नागपूरच्या प्राप्तिकर अधिकार्यांनी ठोकला अकोल्यात तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:58 AM2018-02-03T01:58:02+5:302018-02-03T02:01:09+5:30
अकोला : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्यावरून नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने अकोल्यातील आहुजा-मोटवाणी परिवाराच्या ग्रुपवर सुरू केलेली सर्च मोहीम शुक्रवारीदेखील काही प्रतिष्ठानांवर सुरूच राहिली. धाड टाकणार्या पथकातील काही अधिकारी गेले असले, तरी यातील प्रमुख अधिकारी मात्र अजूनही अकोल्यात तळ ठोकून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्यावरून नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने अकोल्यातील आहुजा-मोटवाणी परिवाराच्या ग्रुपवर सुरू केलेली सर्च मोहीम शुक्रवारीदेखील काही प्रतिष्ठानांवर सुरूच राहिली. धाड टाकणार्या पथकातील काही अधिकारी गेले असले, तरी यातील प्रमुख अधिकारी मात्र अजूनही अकोल्यात तळ ठोकून आहेत.
प्राप्तिकर विभागातील अधिकार्यांची कारवाई अत्यंत गोपनीय असून, अकोल्यातील अधिकार्यांनाही काही बाबी सांगण्यास ते टाळत आहेत. दोन्ही परिवारातील घरातील दागिने, त्यांच्या बँक खात्यातील रकमा, बँक लॉकर्स, झालेली मोठी उलाढालची चाचपणी अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आणखी काही दिवस प्राप्तिकर विभागाचे अधिकारी अकोल्यात थांबणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी दोन्ही प्रतिष्ठानांच्या नावाने आणि भाड्याने घेतलेल्या गोडावूनची झाडाझडती घेतली. नागपूर प्राप्तिकर विभागाचे डीआय जयराज काजला यांना अकोल्यात होत असलेल्या प्रत्येक कारवाईची माहिती पाठविली जात असून, त्यांच्या निर्देशान्वये सूत्र हलविले जात आहेत. त्यानुसार सहायक डीआय एस.पी.जी. मुदलीयार पुढील कारवाई करीत आहेत. आहुजा-मोटवाणी परिवारातील सदस्याचे स्त्री धन आणि कायदेशीर दागिने सोडून, इतर दागिने जप्त करण्यात आले आहेत. बँकेतील रकमांच्या नोंदी आणि आक्षेपार्ह वाटणार्या नोंदीचे दस्तऐवजही प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आहुजा-मोटवाणी ग्रुपच्या अनेक प्रतिष्ठानांवर दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आला. यातील काही प्रतिष्ठान शुक्रवारी बंद होते. हळदी-बेसनच्या व्यावसायापासून तर आजपर्यंतच्या आर्थिक व्यवहार तपासण्याचे कार्य प्राप्तिकर विभागाचे अधिकारी करीत आहेत. संपत्तीचे डिक्लेरेशन आणि दंडाबाबतची माहिती जाहीर केली जाण्याचे संकेत आहेत.