नायब तहसीलदार, तहसीलदारांचा संप मागे; वेतनश्रेणी वाढ करण्यास वित्त विभागाची मंजुरी

By राजेश शेगोकार | Published: April 6, 2023 01:59 PM2023-04-06T13:59:38+5:302023-04-06T13:59:47+5:30

अकोला : नायब तहसीलदार यांना वाढीव ग्रेड पे मिळण्यासाठी  3 एप्रिल 2023 पासून तहसीलदार, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांनी ...

Naib Tehsildar, Tehsildars strike called off; Approval of Finance Department for increase in pay scale | नायब तहसीलदार, तहसीलदारांचा संप मागे; वेतनश्रेणी वाढ करण्यास वित्त विभागाची मंजुरी

नायब तहसीलदार, तहसीलदारांचा संप मागे; वेतनश्रेणी वाढ करण्यास वित्त विभागाची मंजुरी

googlenewsNext

अकोला : नायब तहसीलदार यांना वाढीव ग्रेड पे मिळण्यासाठी  3 एप्रिल 2023 पासून तहसीलदार, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाच्या वित्त विभागाने वेतनश्रेणी वाढ करण्यास मान्यता दिल्याने अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती विभागामध्ये प्रविण ठाकरे विभागीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व जिल्हाध्यक्षसुनिल पाटील अकोला, नीता लबडे अमरावती, कुणाल झाल्टे यवतमाळ आर एन देवकर बुलढाणा, धीरज मांजरे,गजेंद्र मालठाणे वाशीम यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलन यशस्वी केले. 

विशेष म्हणजे या संघटनेचे सदस्य असणारे सर्व उपजिल्हाधिकारी यांनी या आंदोलनामध्ये सहभागी घेतला त्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाल्यामुळे मागणीची तीव्रता वाढली होती. राज्य शासनाने या संदर्भात राज्यभरातील आंदोलनाची दखल घेत वेतनश्रेणी वाढ होण्यास मंजुरी दिली असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे विभागीय सचिव अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

Web Title: Naib Tehsildar, Tehsildars strike called off; Approval of Finance Department for increase in pay scale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला