नायडूंच्या उमेदवारीचे अकोल्यात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:44 AM2017-07-18T01:44:18+5:302017-07-18T01:44:18+5:30
अकोला: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपा व घटक पक्षाने व्यंकया नायडू यांना उमेदवारी दिली असून या उमेदवारीचे अकोल्यात भाजपाच्या वतिने स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपा व घटक पक्षाने व्यंकया नायडू यांना उमेदवारी दिली असून या उमेदवारीचे अकोल्यात भाजपाच्या वतिने स्वागत करण्यात आले. भाजपा कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून व फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला.
जनसंघ ते भाजपा पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत, विद्यार्थी परिषदेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व २५ वर्षांचा संसदीय कामकाजाचा अनुभव असणारे एम. व्यंकय्या नायडू यांची निवड करू न सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केल्याची तसेच शहरी व ग्रामीण विकासाचा अनुभव असणारे ज्येष्ठ सहकारी यांची निवड हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय धोत्रे यांनी दिली. तर उत्तर ते दक्षिण जोडणारा निर्णय राष्ट्रपती व उपराष्ट्रपती उमेदवार निश्चित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना न्याय देण्याची भूमिका तसेच भैरवसिंह शेखावत यांच्यानंतर उपराष्ट्रपती बनण्याचा मान संघ स्वयंसेवकाला मिळाल्याचा आनंद असल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगितले. आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, शेतकरी परिवारातील, ओबीसी तसेच दक्षिण भारतातून जे.पी.आंदोलनाशी जुळणारे, दोन वेळा भाजपाची राष्ट्रीय नेतृत्व करणारे व पक्षासाठी अहोरात्र १९७० पासून संघर्षशील नेते व्यंकय्या नायडू यांच्या निवडीने आनंद होत आहे. उच्चशिक्षित राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्हीही कायदेतज्ज्ञ असल्यामुळे देशाला नवीन दिशेकडे नेतील.
संघटना व विचारधारेसोबत संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणारे तसेच सभागृहातील अनुभव व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला अवगत असलेल्या व्यक्तिमत्त्वाची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी करू न जनतेमध्ये विश्वास निर्माण केल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी व्यक्त केली.