महिला सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतील नाला सफाईची कामे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:48+5:302021-04-22T04:18:48+5:30
शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे तसेच नाल्या व सर्व्हिस लाइनमध्ये दैनंदिन साफसफाई केल्या जाते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून ...
शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे तसेच नाल्या व सर्व्हिस लाइनमध्ये दैनंदिन साफसफाई केल्या जाते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जाताे़ स्वच्छतेच्या कामासाठी मनपाच्या आस्थापनेवर ७४२ पेक्षा अधिक कर्मचारी आहेत़ यांच्या वेतनापाेटी मनपाकडून वर्षाकाठी २१ काेटी रुपये खर्च केले जातात़ दुसरीकडे पडीक वाॅर्डात खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्या देयकापाेटी मनपा प्रशासनाकडून वर्षाकाठी ५ काेटी ६० लक्ष रुपये अदा करते़ अर्थात वेतन व देयकापाेटी २७ काेटी रुपये खर्च केल्यानंतरही शहरात सर्वत्र पसरलेली घाण, धुळीने माखलेले रस्ते, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या व सर्व्हिस लाइनचे किळसवाणे चित्र पहावयास मिळते़ ही बाब लक्षात घेऊनच मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी स्वच्छतेच्या मुद्याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे़
म्हणून महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढली !
आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पदावर कुटुंबातील काेणत्याही एका सदस्याची नियुक्ती केली जाते़ पत्नीला सेवेत रुजू करून घेतल्यानंतर कालांतराने राजीनामा देऊन मुलाला सेवेत घेण्यात येते़ यामुळे मध्यंतरीच्या काळात पुरुषांच्या बराेबरीत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने महिलांची संख्या वाढली़ त्यामुळे नाइलाजाने महिलांवर नाला सफाईची जबाबदारी साेपविल्या जाणार असल्याचे संकेत आहेत़
तीन सफाई कर्मचाऱ्यांचे आदेश रद्द
मनपाच्या संगणक विभागात प्रभारी संगणक चालक म्हणून कार्यरत असलेले लखन चंडाले, सतीश झांझाेटे व श्रीमती शाेभा रिल यांचा आदेश रद्द करीत त्यांना मूळ सफाई कर्मचारी पदावर रुजू हाेण्याचा आदेश मनपा उपायुक्त पंकज जावळे यांनी जारी केला आहे़ सदर तीनही कर्मचाऱ्यांना लवकरच नाला सफाई, रस्त्यांची झाडपूस व सर्व्हिस लाईनच्या साफसफाईची जबाबदारी साेपवली जाणार आहे़