रोहनखेड येथे नाल्याला पूर; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:24+5:302021-09-09T04:24:24+5:30
--------------- दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस आगर : परिसरात दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. मोर्णा नदीसह ...
---------------
दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस
आगर : परिसरात दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. मोर्णा नदीसह मोळखंड, चिंचखेड व चोंडा नाल्याला पूर आल्याने आगर-हातरूण रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली होती. मोळखंड पुलावरून चार ते पाच फूट उंच पाणी वाहत होते. खांबोरा येथील माजी सरपंच राम भरणे हे पुरातून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाय घसरून ते पुरात पडले. स्थानिकांच्या निदर्शनास येताच खांबोरा येथील सोनू देशमुख, आगर येथील ईर्शाद कुरेशी व युवकांनी धाव घेऊन भरणे यांना पाण्याबाहेर काढले. पाऊस खरीप हंगामातील कपाशी पिकास पोषक ठरणार असून, रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी सुध्दा लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
-----------------------------------
पणज परिसरातील बोर्डी नदीला पूर
पणज : परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने परिसरातून वाहणाऱ्या बोर्डी नदीसह नाले तुडुंब भरून वाहत होते. दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार आहे. पावसाचा सोयाबीन, कपाशी, केळी, तूर, मूग, उडीद यासह खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. शेतात ये-जा करणारे रस्ते पावसामुळे बंद झाल्याने शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
----------------