नांदेड-एलटीटी-नांदेड द्विसाप्ताहिक विशेष आता नियमित होणार
By Atul.jaiswal | Published: September 13, 2023 07:02 PM2023-09-13T19:02:21+5:302023-09-13T19:03:07+5:30
अकोला : अकोला मार्गे नांदेड-ते लोकमान्य टिळक टर्मिनन्स, मुंबई दरम्यान धावणारी द्विसाप्ताहिक विशेष गाडी आता लवकरच नियमित एक्स्प्रेस म्हणून ...
अकोला : अकोला मार्गे नांदेड-ते लोकमान्य टिळक टर्मिनन्स, मुंबई दरम्यान धावणारी द्विसाप्ताहिक विशेष गाडी आता लवकरच नियमित एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. हुजूर साहिब नांदेड-एलटीटी-हुजूर साहिब नांदेड ही एक्स्प्रेस गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, येत्या ऑक्टोबर महिन्याच्या नवीन वेळापत्रकात या गाडीचा समावेश होणार असल्याची माहिती आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. १७६६५ नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्स्प्रेस नांदेड येथून दर सोमवारी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथे पोहोचणार आहे. तर गाडी क्र. १७६६७ नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्स्प्रेस दर बुधवारी नांदेड येथून रात्री २१:१५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १३:०० लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. १७६६६ एलटीटी-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दर मंगळवारी एलटीटी येथून १६:४० वाजता प्रस्थान करून दुसऱ्या ८:१० वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे. गाडी क्र. १७६६८ एलटीटी-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दर गुरुवारी एलटीटी येथून १६:५५ वाजता प्रस्थान करून दुसऱ्या ९:०० वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.
या गाड्यांना पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण स्थानकांवर थांबा असणार आहे.