नांदेड - श्री गंगानगर साप्ताहिक रेल्वे गाडी एक एप्रिलपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 05:33 PM2021-03-30T17:33:53+5:302021-03-30T17:36:03+5:30
Nanded - Shri Ganganagar weekly train from April 1 राजस्थानकडे जाण्यासाठी आणखी एक गाडी अकोलेकरांना मिळाली आहे.
अकोला : प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागातून एप्रिल महिन्यात नव्या सहा विशेष गाड्या सुरु करणार असून, यापैकी नांदेड - श्री गंगानगर साप्ताहिक गाडी एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. आठवड्यातून दर गुरुवारी धावणारी ही गाडी अकोला स्थानकावरून जाणार असल्याने राजस्थानकडे जाण्यासाठी आणखी एक गाडी अकोलेकरांना मिळाली आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार , नांदेड येथून विविध भागात जाण्याकरिता एप्रिल महिन्यात सहा नवीन विशेष रेल्वे सुरु होणार आहेत. यामध्ये ०७६२३ नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर गुरुवार) ही गाडी १ एप्रिल पासून नांदेड येथून सकाळी ०६.५० वाजता सुटेल आणि बसमत हिंगोली, वाशीम, अकोला , शेगाव, सुरत, वडोदरा, अहेमदाबाद, अबु रोड, जोधपुर, बिकानेर मार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री १९.२० वाजता पोहोचेल. ही गाडी दर गुरुवारी अकोला स्थानकावर येईल.
०७६२४ श्री गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) ही गाडी ३ एप्रिल पासून श्री गंगानगर येथून दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि बिकानेर जोधपुर, अबुरोड, अहेमदाबाद, वडोदरा, सुरत, शेगाव, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रात्री ०२.३० वाजता पोहोचेल. ही गाडी दर सोमवारी अकोला स्थानकावर येईल.