नराधम बापानेच केले अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:08 AM2017-11-22T02:08:19+5:302017-11-22T02:08:59+5:30
यथेच्छ मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत एका नराधम बापाने मुलीला पाय दाबण्यासाठी बोलावून तिच्यावर तोंड दाबून जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यथेच्छ मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत एका नराधम बापाने मुलीला पाय दाबण्यासाठी बोलावून तिच्यावर तोंड दाबून जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. हिवरखेडमध्ये घडलेल्या या गंभीर प्रकरणाची तक्रार १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. सदर प्रकरण हिवरखेड पोलिसांक डे वर्ग करण्यात आले आहे.
अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुंबिनी नगरात राहणार्या एका बापाने त्याच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला रविवारी त्याचे सासर असलेल्या हिवरखेड येथे घेऊन गेला. या ठिकाणी यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर घरी खाटेवर झोपलेला असताना पाय खूप दुखत असल्याचे कारण समोर करून त्याने १२ वर्षीय मुलीला पाय चेपण्यासाठी बोलावले. अल्पवयीन मुलगी पाय चेपत असताना नराधम बापाची नजर मुलीवरच फिरली अन् त्याने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर जबरी संभोग केला. बापानेच केलेल्या अत्याचारामुळे प्रचंड दहशतीत असलेल्या मुलीने हा प्रकार मनात दाबण्याचा प्रयत्न केला; मात्र राहून-राहून रडणारी व त्रास होत असलेल्या मुलीची अवस्था मातेच्या लक्षात आली. तिने मुलीची विचारपूस केली असता तिने बापाचा अत्याचार आईकडे कथन केला, त्यामुळे माय-लेकीने तत्काळ डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून मद्यधुंद बापाचा हा प्रताप डाबकी रोड पोलीस ठाण्यात सांगितला.
पोलिसांनीही तातडीने वैद्यकीय उपचार क ेल्यानंतर नराधम बापाविरुद्ध बलात्कार व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर बापाचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणाचे घटनास्थळ हिवरखेड असल्याने डाबकी रोड पोलिसांनी हा तपास आणि नराधम बापास हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस त्याला बुधवारी न्यायालयात हजर करणार आहेत. बापाच्या या काळिमा फासणार्या कृत्याने मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी झाल्याचे वास्तव आहे.