नाथपंथी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर; राईनपाडातील हत्याकांडाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:12 IST2018-07-06T16:06:17+5:302018-07-06T16:12:01+5:30
अकोला : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी )समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन शिक्षा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

नाथपंथी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर; राईनपाडातील हत्याकांडाचा निषेध
अकोला : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी )समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन शिक्षा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
लहान मुले पळविणारी टोळी समजून राईनपाडा येथे नाथपंथी या भटक्या जमातीतील पाच जणांना जबर मारहाण करुन ठार मारण्यात आल्याची घटना गत १ जुलै रोजी घडली. या घटनेचा घटनेचा निषेध करीत, या प्रकरणातील मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी, हत्याकांडातील मृतकांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये मदत देण्यात यावी, अशा घटना घडू नयेत यासाठी भारतभर भ्रमण करणाऱ्या नाथपंथी समाजाला शासनामार्फत ओळखपत्र देण्यात यावे, भिक्षुकी व्यवसाय असलेल्या या समाजाला विशेष सवलती व आरक्षण देण्यात यावे आणि भटक्या जमातीसाठी उद्योग-धंद्याकरिता विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावे. यावेळी शहीनाथ बाबर,भिवनाथ शिंदे,धनराज तांबोकार, भाऊराव याहारे,चंद्रभान शिंदे, मगन सनिशे, बाबाराव वाघरे, कलास वढोरकर ,बाबाराव पांगरे, पंजाब पांगरे, विजय पांगरे,