सनदी लेखापाल विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:38 PM2019-12-18T18:38:08+5:302019-12-18T18:38:26+5:30
बंद पडणाºया कंपन्या आणि लेखापालांची नैतिकता यावर सारासार विचारधारा प्रकट करणारे मंथन, अकोल्यातील सनदी लेखापाल विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात झाले.
अकोला : अलीकडे बंद पडणाºया कंपन्या आणि लेखापालांची नैतिकता यावर सारासार विचारधारा प्रकट करणारे मंथन, अकोल्यातील सनदी लेखापाल विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात झाले. समारोपीय दिवसाच्या प्रथम सत्रात कंपनी कायद्यावर मुंबईचे सीए अर्पित काबरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बंद पडणाºया विविध कंपन्यांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात मंगेश किनरे, मुंबई यांनी लेखापालाच्या इथिक्सवर मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांशी सांगोपांग चर्चा केली. सनदी लेखापालाच्या विश्वात नैतिकतेला अत्यंत महत्त्व असून, ही नैतिकता पालन करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया शाखा अकोला आणि वेस्टर्न इंडिया सीए स्टुडंट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कालपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनचा बुधवारी समारोप झाला. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सीए होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना येणाºया समस्या आणि त्यावर उपाय यावर सलग दोन दिवस मंथन झाले.
सनदी लेखापाल विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात भारतभरातून ४५० लेखापाल विद्यार्थी सहभागी झाले होते. तृतीय सत्र नागपूरचे विभागीय आयुक्त कमलकिशोर राठी यांनी घेऊन यावेळी उपस्थितांना प्रशासकीय सेवेची माहिती दिली. अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारणारी मराठी चित्रपट अभिनेत्री सीए अंकिता बोरा यांनीही व्यवसायासोबत एखादा छंद जोपासून तो छंद साकारण्याचे आवाहन येथे केले. अधिवेशनात राष्ट्रीय पेपर सादर करणाºया विद्यार्थ्यांचा सन्मान करून पुरस्कार वितरित करण्यात आलेत. या तांत्रिक सत्रांचे संचालन सीए रमेश चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन हर्ष नावंदर यांनी मानलेत. तर समारोपीय सोहळ्याचे आभार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी मानलेत. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सचिव केयुर देढिया, उपाध्यक्ष जलज बाहेती, विपुल पटेल, कार्यकारी सदस्य गौरीशंकर मंत्री, हिरेन जोगी, डब्ल्यूआयसीएएसएचे उपाध्यक्ष हर्ष नावंदर, सचिव दीपन शर्मा, कोषाध्यक्ष श्याम अग्रवाल, संयोजक नीलेश जयस्वाल, कार्यकारी सदस्य संदेश अग्रवाल, अपूर्वा अग्रवाल समवेत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.