‘राष्ट्रीय वाचनालय मोहीम’ कागदावरच!
By admin | Published: March 9, 2016 02:02 AM2016-03-09T02:02:03+5:302016-03-09T02:02:03+5:30
पश्चिम विदर्भातील सार्वजनीक ग्रंथालये १८९४ सुविधांपासून वंचीत.
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)
वाचन संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सार्वजनीक वाचनालयांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी शासनाने दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय वाचनालय मोहीम हाती घेतली. या मोहीमेंतर्गत वाचनालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार होता; मात्र पश्चिम विदर्भात ही मोहीम कागदावरच राबविली गेल्याने अमरावती विभागातील १ हजार ८९४ गं्रथालये विविध सुविधांपासून वंचीत आहेत.
ह्यगाव तिथे ग्रंथालयह्ण ही संकल्पना राज्यभर रूजली असून, शहरासह बहुतांश गावांमध्ये सार्वजनिक ग्रंथालये सुरू झाली आहेत; परंतू पुस्तके ठेवण्याची व्यवस्था नसणे, गं्रथपालांची किंवा गं्रथालयातील कर्मचार्यांची पुस्तके शोधण्याबाबत असलेली अनास्था, अपुरे अनुदान यासह सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे गं्रथालयांच्या समस्या दूर करण्यासाठी, तसेच वाचनालयांना अधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय वाचनालय मोहिम हाती घेण्यात आली होती. प्रश्नमंजुषा स्पर्धा, संगीत स्पर्धा, सर्जनशील लेखन स्पर्धा या माध्यमातून वाचनालय वाचकांपर्यत पोहचविण्यात येणार होते. राष्ट्रीय वाचनालय माहिमेच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोलकाता येथील राजाराममोहन रॉय लायब्ररी फाऊंडेशन या संस्थेकडे देण्यात आली होती; मात्र अमरावती विभागात राष्ट्रीय वाचनालय मोहीम नावापूरतीच राहिली. त्यामुळे अमरावती विभागातील १ हजार ८९४ सार्वजनीक ग्रंथालये राष्ट्रीय वाचनालय मोहिमेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ३९९, अकोला ४७३, बुलडाणा ३५७, यवतमाळ ३५३ व वाशिम जिल्ह्यातील ३१२ सावर्जनीक गं्रथालयांमध्ये विविध सुविधांचा अभाव दिसून येतो.