राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुलींचा जोरदार ठोसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:17 AM2018-01-23T00:17:25+5:302018-01-23T00:17:30+5:30

अकोला: महाराष्ट्राच्या मुलींनी ६३ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग(१९ वर्षाआतील मुले-मुली) स्पर्धेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सोमवारी स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी मुलींच्या गटातील उपान्त्यपूर्व फेरीतील लढती झाल्या. रोमहर्षक व उत्कंठावर्धक झालेल्या या लढतींमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कडवी झूंज देवून उपान्त्यफेरीत प्रवेश निश्‍चित केला.

National School Boxing Competition: Maharashtra's girls throng! | राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुलींचा जोरदार ठोसा!

राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुलींचा जोरदार ठोसा!

googlenewsNext
ठळक मुद्देगौरी, साक्षी, संस्कृती, यशश्री, अलिया, दिया उपान्त्य फेरीत

नीलिमा शिंगणे-जगड । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्राच्या मुलींनी ६३ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग(१९ वर्षाआतील मुले-मुली) स्पर्धेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सोमवारी स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी मुलींच्या गटातील उपान्त्यपूर्व फेरीतील लढती झाल्या. रोमहर्षक व उत्कंठावर्धक झालेल्या या लढतींमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कडवी झूंज देवून उपान्त्यफेरीत प्रवेश निश्‍चित केला.
सायंकाळच्या सत्रात ६६ किलो वजनगटात गोव्याची मुस्कान आणि महाराष्ट्राची अलिशा नाईकवाडे यांच्यात लढत झाली. कोल्हापूरच्या अलिशाने ही लढत ३-0 अशी गुणांच्या आधारावर जिंकली. ७५ किलो वजनगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत अकोल्याच्या साक्षी गायधने हिने हरियाणाच्या मेघाला ५-0 ने धूळ चारली.  सकाळच्या सत्रात ४२ ते ४५ किलो वजनगटात अकोल्याची गौरी जयसिंगपुरे, ४५ ते ४८ किलो वजनगटात सातार्‍याची यशश्री धनवाडे, ५७ ते ६0 किलो वजनगटात पुण्याची संस्कृती सुर्वे आणि अकोल्याची दिया बचे यांनी विजय मिळवून उपान्त्यफेरी गाठली.
दरम्यान, मुलांच्या गटात झालेल्या लढतींमध्ये ८१ किलो वजनगटात चंदीगडच्या नवज्योत याला महाराष्ट्राच्या ऋषभने धराशाही केले. तर ९१ किलो वजनगटात अकोल्याच्या रोहण टांक याने आयपीएससीच्या अजयचा पराभव केला; मात्र महाराष्ट्राचा स्टार खेळाडू राष्ट्रीय पदक विजेता अजहर अली याला आज पराभवाचा सामना करावा लागला. अजहरकडून महाराष्ट्राला पदकाची आशा होती. ९१ किलोच्या वर वजनगटात महाराष्ट्राच्या मोन्टीने केंद्रीय विद्यालय संघटनच्या ऋषिकेशकडून पराभव स्वीकारला. महाराष्ट्राच्या अजय पेंदोर, राहिल सिद्धीकी, जिब्रान खान, साकीब पठाण, रोहण टांक यांच्याकडून सुवर्ण पदकांची अपेक्षा आहे.
मुलांच्या गटात उपान्त्यपूर्व फेरीत चंदीगडचा विशाल, उत्तराखंडचा कुणाल, आयपीएससीचा सौरभ, सीबीएससीचा जगमोहन, हिमाचल प्रदेशचा आशिष, पंजाबचा करणवीर, हरियाणाचा नवीन यांनी विजय मिळविला. मुलींच्या गटात हरियाणाची अमृता, मध्यप्रदेशची कुसुमलता, गोव्याची अनिषा, हिमाचल प्रदेशची मेनका, तामिळनाडूची ऐश्‍वर्या, पंजाबची नंदिनी यांनी लढत जिंकली.
 

Web Title: National School Boxing Competition: Maharashtra's girls throng!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.