बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:28+5:302021-03-04T04:32:28+5:30
निबंध स्पर्धेत उर्दू शाळेतील विद्यार्थिनींची बाजी अकाेला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिव सप्ताहात निबंध स्पर्धा आयाेजित ...
निबंध स्पर्धेत उर्दू शाळेतील विद्यार्थिनींची बाजी
अकाेला
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिव सप्ताहात निबंध स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. यात जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक कन्या शाळेतील (शहर)विद्यार्थिनींनी सहभाग नाेंदवला. स्पर्धेत उमैमा आफरीन (इयत्ता ७वी) व सानिया परवीन (इयत्ता ८वी) या दोघींनी यश संपादन केले. दाेघींची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे प्रमाणपत्र , स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. दाेघींचे प्रभारी मुख्याध्यापक खान मोहम्मद अख्तरुल अमीन यांनी काैतुक केले.
प्रगट दिन महोत्सवानिमित्त गजानन विजय ग्रंथाचे पारायण
अकाेला
वरूर जऊळका येथे सत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त १ मार्चपासून योग योगेश्वर संस्थानमध्ये गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजन करण्यात आले आहे गजानन विजय ग्रंथाचे वाचक हभप वैभव महाराज वसू हे आहेत
सप्ताहामध्ये सकाळी काकडा भजन,गजानन विजय ग्रंथाचे पारायण सायंकाळी हरिपाठ ,हरिकीर्तन राहील सप्ताह मध्ये हभप श्रीधर महाराज पातोंड, रवींद्र महाराज केंद्रे , अशोक महाराज राजगुरू,मंगेश महाराज ठाकरे व गणेश महाराज शेटे यांचे ५ मार्चला काल्याचे कीर्तन होणार आहे. कार्यक्रमामध्ये सोपान महाराज उकर्डे,विक्रम महाराज शेटे ,विलास महाराज कराड, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, प्रवीण महाराज कुलट, अमोल महाराज कुलट ,श्रीधर महाराज तळोकार, गोपाल महाराज नारे, प्रसाद महाराज कुलट पुरुषोत्तम महाराज रौराळे, मोहन महाराज काळे, विष्णू महाराज आवारे संतोष महाराज घुगे ,विठ्ठल महाराज केंद्रे ही गायक-वादक मंडळी उपस्थित राहणार आहे.
दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न साेडवा
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना
अकाेला महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषद प्रशासनामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली. . सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा. प्र . ) सूरज गोहाड आणि संघटनेकडून जिल्हाध्यी संजय बरडे , सचिव मो .अजीज, कोषाध्यक्ष दिलीप सरदार , उपाध्यक्ष रवींद्र देशमुख , जावेद इकबाल , महिला संचालक डॉ . निलिमा आमले , दि. ल. वाघमारे , सुधीर कडू , श्रीकांत देशमुख , गणेश महल्ले आदी उपस्थित होते