राष्ट्रीयीकृत बँकाचा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:42 PM2018-06-24T13:42:54+5:302018-06-24T13:47:32+5:30

राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.

Nationalized bank's money lender harrash farmers! | राष्ट्रीयीकृत बँकाचा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर !

राष्ट्रीयीकृत बँकाचा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर !

Next
ठळक मुद्देअकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला.पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

- राजेश शेगोकार

अकोला  : पीक कर्ज देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँकेच्या शाखाधिकाऱ्याने महिलेला शरीरसुखाची मागणी केली, कर्ज मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला अपमानित केल्याने त्याने आत्महत्या केली. अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या सर्व घटना वेगवेगळया ठिकाणी घडल्या असल्या तरी या घटनांमध्ये एक समान सुत्र आहे ते म्हणजे राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.


कागदपत्रांसाठी ही होते पिळवणूक
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे काम बँकांमार्फत सुरू आहे; मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक बँकाचे नियम वेगळे त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनाच बँकाची समन्वय बैठक घेऊन कोणती कागदपत्रे घ्यावीत हे ठरवावे लागले.
वाढत्या शेतकरी आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हे महत्वाचे कारण नमुद केले होते. सावकारांचे व बँकाचे असे दोन्ही कर्ज शेतकºयांचे सारे आर्थिक गणीतच बिघडवून टाकत असल्याने शासनाने कर्जमाफीचे पॅकेज जाहिर केले. या पॅकेज मध्ये शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मुख्यत: फायदा बँकाचाच झाला. अनेक बँकाचा एनपीए वाचला, डबाघाईस आलेल्या बँकानी बाळसे धरले, सहकारी बँकानी तर कातच टाकली. ज्या शेतकºयांच्या साठी कर्जमाफी दिली तो मात्र लगेचच आलेल्या हंगामात पुन्हा कर्जबाजारी झाला. निसर्गाने नेहमीप्रमाणे साथ न दिल्याने त्याचे कर्ज थकित झाले अन् पुन्हा एकदा आत्महत्यांचे चक्र वेगाने फिरू लागले. या पृष्ठभूमीवर युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी दिली त्याचे गुºहाळ अजून सुरूच असून आता पीक कर्ज वाटपाची संथ गती शेतकºयांसाठी संकट ठरत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ९ जुन रोजी अकोल्यात पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता अमरावती विभागात राष्ट्रीयीकृत बँकानी केवळ २ टक्का पीक कर्ज वाटप केले होते. याचा चांगलाच समाचार खोतांनी घेतल्यावरही बँकानी हातपाय हलविले नाही अखेर अमरावती विभागातील जिल्हाधिकाºयांनी आक्रमकता दाखविल्याने हा पीक कर्ज वाटप १५ टक्यांपर्यंत आले. वास्तविक कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी नवीन पीक कर्ज वाटपासाठी पात्र ठरले आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकºयांना जुन महिन्याच्या आधीच तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले असते तर पेरणीची सोय लावता आली असती मात्र बँकाचा संथपणा पुन्हा एकदा शेतकºयांना सावकारी चक्र व्युहात अडकवित आहे. बँकाना सरकारकडून निधी वळता होत नसेल तर त्यांनी तसे सरकारला खडसावून सांगावे मात्र त्यासाठी थेट शेतकºयांच्या स्वाभिमानाशी अन् त्यांच्या अर्धांगिणीवर नजर ठेवण्यापर्यत मजल जात असले तर ही नवी सावकारी मोडून काढण्यासाठी सरकारने कठोर होणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या बँकाना कुणाशीही स्पर्धा करावी लागत नाही त्यामुळेच ‘ग्राहक सेवा’ हे केवळ नावापुरतचे राहिले आहे. राष्ट्रीयीकृत बँकामध्ये ग्राहकांशी होणारा व्यवहार हा उद्दामपणाचा असल्याचे अनेक दाखले रोज मिळतात त्यामुळे बुलडाण्यात झालेल्या त्या गंभिर प्रकारासोबतच पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

 

Web Title: Nationalized bank's money lender harrash farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.