कापसापासून मिळणार आता नैसर्गिक रंगीत कापड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:06 PM2019-07-26T12:06:58+5:302019-07-26T12:07:41+5:30

अकोला : आता नैसर्गिकरीत्या रंगीत कापड ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठीचे रंगीत कापसाचे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.

 Natural colored fabrics will now be available from cotton! | कापसापासून मिळणार आता नैसर्गिक रंगीत कापड !

कापसापासून मिळणार आता नैसर्गिक रंगीत कापड !

googlenewsNext

अकोला : आता नैसर्गिकरीत्या रंगीत कापड ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठीचे रंगीत कापसाचे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. यासंदर्भातील सामंजस्य करार गुरुवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुंबईत केला आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस तज्ज्ञ स्व.डॉ. एल.डी.मेश्राम यांनी १९९०-२००० मध्ये रंगीत कापूस बियाणे निर्मिती केली होती, तथापि, हे संशोधन पुढे व्यापक स्वरू पात झाले नाही; परंतु रंगीत कापसाच्या बियाण्याचे जतन मात्र या कृषी विद्यापीठाने केले आहे. आता या प्रक्रि येला पुन्हा व्यापक स्वरू प प्राप्त करू न देण्यासाठी केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संस्था नागपूर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन (सीरकॉट)संस्था, मुंबई आणि डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक रंगीत कापडासाठीचा संयुक्त उपक्रम राबविणार आहे.
सद्यस्थितीत पांढऱ्या रंगाच्या कापसावर कृत्रिमरीत्या डाय करून रंगीत वस्त्रे निर्मिती होत आहे; परंतु कालांतराने कृत्रिमरीत्या रंगविलेल्या कापडाचा रंग हळूहळू निघून जातो व काही प्रमाणात त्याची अ‍ॅलर्जीसुद्धा बºयाच जणांना होते व असे कापड वापरातून बाद होतात. आता मात्र आपणांस नैसर्गिकरीत्या तपकिरी रंगाचे कापड उपलब्ध होणार असून, कालांतराने विविध रंगांचे कापडसुद्धा बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी सीआयसीआर, सीरकॉट आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रयत्नाने शक्य होणार आहे. सीआयसीआरने व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने रंगीत कापूस उपलब्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली असून, कापसापासून कापड तयार करू न शर्ट, जॅकेट वैगरेची विक्री सीरकॉट संस्था करणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार मुंबई येथील सीरकॉट संस्थेत करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी.जी. पाटील, डॉ. व्ही.के.खर्चे, सीरकॉटचे सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.


 रंगीत कापसाची केली पेरणी
या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ५० एकर प्रक्षेत्रावर ‘वैदेही’ या तपकिरी रंगाच्या कापूस वाणाची २०१९ मध्ये पेरणी करण्यात आली असून, उत्पादित कापूस सीरकॉट, मुंबई यांना पुरविण्यात येणार आहे व तेथे यावर प्रक्रिया करून नैसर्गिकरीत्या रंगीत कापड बाजारात उपलब्ध होणार आहे.
 

 

Web Title:  Natural colored fabrics will now be available from cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.