निसर्गाची करणी...कुपनलिकेतून वाहतेय भरभरून पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 04:01 PM2020-07-24T16:01:03+5:302020-07-24T16:01:25+5:30

कुपनलिकेतून (बोअरवेल) मधून मोटारपंपशिवाय पाणी ओसंडून वाहत आहे.

Nature's deed ... water flowing through the borarwell without pump | निसर्गाची करणी...कुपनलिकेतून वाहतेय भरभरून पाणी !

निसर्गाची करणी...कुपनलिकेतून वाहतेय भरभरून पाणी !

Next

- संजय उमक
मूर्तिजापूर : निसगार्ची कृपा झाली तर काय होईल सांगता येत नाही. अशीच कृपा तालुक्यातील निंबा येथील शेतकऱ्यावर झाली असून, ८ वर्षांपूवी शेतात खोदलेल्या कुपनलिकेतून (बोअरवेल) मधून मोटारपंपशिवाय पाणी ओसंडून वाहत आहे.
तालुक्यातील निंबा येथील शेतकरी दिपक फुके यांनी शेती सिंचनासाठी आपल्या एक हेक्टर शेतात आठ वर्षांपूर्वी तीनशे फुट बोअर केल. शस बोअरला अडीचशे फुट अंतरावर भरपूर पाणी लागले. त्यात त्यांनी ७ हॉर्सपावरचे मोटारपंप बसविले. तेव्हा पासून आपल्या शेतीचे सिंचन करुन इतर लोकांच्या शेतीता पाणी पुरवठा करुन त्यांच्या शेतीचीही सिंचन व्यवस्था केली आहे. गावापासून केवळ ३०० मिटर अंतरावर शेती असल्याने २०१५ साली गावात प्रचंड दुष्काळ पडला असता संपूर्ण गावाला याच बोअर मधून पाणी पुरवठा करण्यात आला असल्याचे दिपक फुके यांनी लोकमतशी बोलताना सांगितल. दरम्यान, या वर्षी निंबा परिसरात भरपूर प्रमाणात पाऊस झाला असून, गत २४ तासात या गावात ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात आतापर्यंत ४२०.६ मिलीमीटर (५६.६३ टक्के ) एवढे पर्जन्यमान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी दिपक फुके शेतात गेले असता शेतातील कुपनलिकेतून पाणी ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज नसताना ओसंडून वाहणारे पाणी पिकात सोडावे लागत आहे. यापूर्वी ७ हॉर्सपावरच्या मोटारपंपने त्यांनी संपूर्ण बोअरमधले पाणी बाहेर काढून उपसा परण्याचाही प्रयत्न केला असता २४ तासानंतर ही पाण्याची पातळी उन्हाळ्यातही कमी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

८ वर्षांपूर्वी शेतात बोअरवेल केले त्यावेळी २५० फुट अंतरावर भरपूर पाणी लागले. तेव्हा पासून आजपर्यंत बोअरमधून पाणी ओसंडून जाण्याचा प्रकार कधीच झाला नाही. यावर्षी मात्र पहिल्यांदाच बोअरमधून पाणी ओसंडून वाहत आहे.
दिपक फुके
शेतकरी, निंबा, ता. मूर्तिजापूर

लोकांच्या मते हा नैसर्गिक चमत्कार असला तरी असला प्रकार नाही. हा प्रकार सर्वसाधारण आहे. कुठेतरी या बोअरला लांब मोठ्या जल प्रवाहाची कनेक्टिव्हिटी आहे. त्या शिवाय हे होणे शक्य नाही. बहूदा जमीनीखाली मोठा जलसाठा असतो. यामुळे तसे होते. काही वेळाने ओसंडून वाहणारे पाणी बंद होते.
- उल्हास बंड
भूवैज्ञानिक, भूजल विकास सर्वेक्षण यंत्रणा, उपसंचालक कार्यालय अमरावती

Web Title: Nature's deed ... water flowing through the borarwell without pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.