‘नवप्रकाश योजना’, इतर सुविधांसाठी विशेष शिबिर

By admin | Published: April 3, 2017 08:22 PM2017-04-03T20:22:18+5:302017-04-03T20:22:18+5:30

सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन वीज ग्राहकांना देण्याकरिता अकोला शहर विभागाच्या वतीने बुधवारी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

'Navprabha Yojana', special camp for other facilities | ‘नवप्रकाश योजना’, इतर सुविधांसाठी विशेष शिबिर

‘नवप्रकाश योजना’, इतर सुविधांसाठी विशेष शिबिर

Next

ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

अकोला: महावितरणची नवप्रकाश योजना, फॉल्टी मीटर बदलविणे, वीज बिल दुरुस्ती, मोबाइल अ‍ॅप, मोबाइल क्रमांक नोंदणी व इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन वीज ग्राहकांना देण्याकरिता अकोला शहर विभागाच्या वतीने बुधवार, ५ एप्रिल २०१७ ते शनिवार ८ एप्रिल २०१७ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या शहर विभागाकडून करण्यात आले आहे.
थकीत देयकामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना सुरू आहे. या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी या योजनेची माहिती या ठिकाणी मिळणार असून, या योजनेतील तरतुदीनुसार ग्राहकांना त्यांची खंडित वीज जोडणी पूर्ववत करता येणार आहे. सोबतच इतरही अनेक सुविधांची माहिती व मार्गदर्शन लाभणार आहे. वरील चारही दिवशी संबंधित कामाकरिता शहर विभागातील क्र. १,२ व ३ या उपविभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करतील. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या शहर विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: 'Navprabha Yojana', special camp for other facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.