नवरात्रोत्सवापूर्वीच कर्जमुक्तीचा शेतकर्‍यांना लाभ द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:45 AM2017-09-12T00:45:42+5:302017-09-12T00:45:59+5:30

भाजपाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून,  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देताना शेतकर्‍यांना  रांगेत तासन्तास ताटकळत ठेवल्या जात आहे. आधार  कार्डमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून शेतकर्‍यांची  बोळवण केली जात आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्ती  करण्याच्या नावाखाली शेतकरी बांधवांना शासकीय  कार्यालयांचे हेलपाटे घ्यावे लागत आहेत. नवरात्र उत्सवा पूर्वी शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे तातडीने निवारण  करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्या; अन्यथा गंभीर  परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना देण्यात आला. 

Before the Navratri festival, give relief to the farmers of debt relief! | नवरात्रोत्सवापूर्वीच कर्जमुक्तीचा शेतकर्‍यांना लाभ द्या! 

नवरात्रोत्सवापूर्वीच कर्जमुक्तीचा शेतकर्‍यांना लाभ द्या! 

Next
ठळक मुद्देशिवसेनेचा जिल्हाधिकार्‍यांना इशारासेनेच्या मोर्चाने दणाणले शहर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भाजपाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून,  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देताना शेतकर्‍यांना  रांगेत तासन्तास ताटकळत ठेवल्या जात आहे. आधार  कार्डमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून शेतकर्‍यांची  बोळवण केली जात आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्ती  करण्याच्या नावाखाली शेतकरी बांधवांना शासकीय  कार्यालयांचे हेलपाटे घ्यावे लागत आहेत. नवरात्र उत्सवा पूर्वी शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे तातडीने निवारण  करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्या; अन्यथा गंभीर  परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना देण्यात आला. 
 कर्जमाफीच्या नावाखाली भाजपाने शेतकर्‍यांच्या भावनांशी  खेळ चालवला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे  अर्ज सादर करण्याचा निकष शेतकर्‍यांसाठी त्रासदायक ठरत  आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे त्यात  अधिकच भर पडल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख  नितीन देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढला. रेल्वे स्टेशन रोडवरील जिजाऊ  हॉल येथून  मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोर्चात शिवसेना  आ. गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर,  जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, मा.आ. संजय गावंडे, उ पजिल्हाप्रमुख बंडू ढोरे, गोपाल दातकर, दिलीप बोचे, रवींद्र  पोहरे, मुकेश मुरूमकार, महादेवराव गवळे, डॉ. दीपक  केळकर, शहरप्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, प्रदीप  गुरुखुद्दे, तालुकाप्रमुख विकास पागृत, विजय माहोड, संजय  शेळके, अप्पू तिडके, गजानन मानतकर, रवी मुर्तडकर,  श्याम गावंडे, बळीराम कपले, आनंद बनचरे, विनायक  गुल्हाने, हरिभाऊ भालतिलक, विनीत पाटील भौरदकर,  सुभाष धनोकार, नगरसेवक गजानन चव्हाण, संतोष  अनासने, सर्कलप्रमुख दिनेश सरोदे, उपशहर प्रमुख  अभिषेक खरसाडे, योगेश गीते, अश्‍विन नवले, राहुल  कराळे, दिनू सुरोसे, तरुण बगेरे, गजानन बोराळे, शहरप्रमुख  विक्रांत शिंदे, सुनील रंधे, आनंद बनचरे, प्रवीण इंगळे, स तीश मानकर, अविनाश मोरे,अजय देशमुख, डॉ.राजेंद्र शर्मा,  संजय वाडेकर आदींसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले  होते. 

काय म्हणाले पदाधिकारी?
जिल्हाधिकार्‍यांसोबत आ.गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्क  प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, मा.आ.  संजय गावंडे यांनी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील किती  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, ऑनलाइन प्रक्रिये त तांत्रिक अडचणी येत असताना त्या दूर करण्यासाठी  पर्यायी व्यवस्थेची उभारणी का केली नाही, असा सवाल  आ.बाजोरिया यांनी उपस्थित केला. अर्ज सादर करताना शे तकर्‍यांना त्रास होत असून, सेतू केंद्र चालकांकडून आर्थिक  लूट केली जात असल्याचे नितीन देशमुख यांनी नमूद केले.  या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले  जात असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  सांगितले. यावेळी सविता वाकोडे, सुनीता मेटांगे, ज्योत्स्ना  चोरे, देवश्री ठाकरे उपस्थित होत्या.


मुस्लीम बांधवांचा मोठा सहभाग
कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेने काढलेल्या मोर्चात जिल्ह्या तील शेतकर्‍यांसह मुस्लीम बांधवांची उपस्थिती लक्षणीय हो ती. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन मुस्लीम तरुण मोर्चात  सहभागी झाले होते. 

बैलगाड्यातून पोहोचले पदाधिकारी!
शेतकर्‍यांसाठी काढलेल्या मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी  बैलगाड्यांमधून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.  गोरेगाव येथील सविता वाकोडे यांच्यासह असंख्य महिला  मोर्चात सहभागी होत्या. बैलगाड्यातून वाकोडे यांच्यासह  माजी नगरसेविका राजेश्‍वरी शर्मा व इतर महिलांनी  जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. 

Web Title: Before the Navratri festival, give relief to the farmers of debt relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.