जलवाहिनीचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:25+5:302021-05-16T04:18:25+5:30

नाली तुडुंब; नगरसेवकांचे दुर्लक्ष अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या डाबकी राेड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ...

Navy work stalled | जलवाहिनीचे काम ठप्प

जलवाहिनीचे काम ठप्प

Next

नाली तुडुंब; नगरसेवकांचे दुर्लक्ष

अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या डाबकी राेड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगत एसबीआयची शाखा आहे. या ठिकाणी प्रमुख चाैकातील मुख्य नाली घाणकचऱ्याने तुडुंब भरली आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नालीच्या साफसफाईकडे मनपासह या प्रभागातील नगरसेवकाचे दुर्लक्ष हाेत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कामगार कल्याण मंडळासमाेर मातीचे ढीग

अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या कामगार कल्याण मंडळालगत मनपाची मुख्य जलवाहिनी आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी खाेदकाम करण्यात आले. मात्र कामगार कल्याण मंडळासमाेर मातीचे ढीग साठविण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुख्य रस्त्यावर सांडपाण्याचे लाेट

अकाेला : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानासमाेरील मुख्य रस्त्यावर नालीतील घाण सांडपाणी तुंबले आहे. परिसरातील खासगी हाॅस्पिटलमधून निघणारे सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांची मनपाकडून साफसफाई केली जात नसल्यामुळे चक्क मुख्य रस्त्यावर सांडपाण्याचे लाेट पसरल्याचे दिसत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.

निमवाडी रस्त्यावरील पथदिवे बंद

अकोला : मुख्य मार्गावरील पथदिवे सुरू राहत असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. मात्र खदान पोलीस ठाणे ते निमवाडी लक्झरी बस स्टॅन्ड मार्गावरील पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता मनपाने तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

दुभाजकालगत मातीचे ढीग

अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर साचणाऱ्या मातीची विल्हेवाट न लावता मनपाचे सफाई कर्मचारी दुभाजकालगत मातीचे ढीग लावत असल्याचे दिसून येतात. वाहनांमुळे दिवसभर मातीचा धुराळा उठत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब आराेग्य निरीक्षकांच्या निदर्शनास येत नाही का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

माेकाट श्वानांचा बंदाेबस्त करण्याची मागणी

अकोला : शहराच्या विविध भागात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. वाशिम बायपास चौकातील कमलानगर चाैक, भांडपुरा चाैक, माेठी उमरी व परिसरात मोकाट श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहनचालकांना या भागातून प्रवास करणे मुश्कील झाले आहे. मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने या श्वानांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Navy work stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.