अकोल्यातील युवा गजलकार नईम फराजची झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:06 AM2018-01-12T02:06:08+5:302018-01-12T02:06:25+5:30
अकोला : अकोल्यातील युवा गजलकार नईम फराज यांना आला आहे. जुने शहरातील अगरवेसजवळ राहणारे, मध्यमवर्गीय कुटुंबीयातील मोहम्मद हाशम यांचे सुपुत्र असलेल्या नईमची दखल थेट भारतीय दूतावासाने घेतली असून, त्यांना चार दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौर्यावर आमंत्रित केले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अकोल्यातील युवकाच्या प्रगतीचा आलेख अनेकांसाठी प्ररेणादायी आहे.
संजय खांडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक १0 मध्ये शिक्षण घेऊन नईमने स्वत:ला घडविले. जमा, वहिद सारखे गुरुवर्य भेटल्याने नईमला जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची सवय लागली. या सवयीनेच पुढे त्याला मोठे शायर म्हणून नावारूपास आणले आहे. त्यानंतर उस्मान आझाद हायस्कूलमध्ये फसीउल्ल नकीब, कलाम, सईद खॉ या सुप्रसिद्ध साहित्यकारांसारख्या गुरुजनांचा सहवास लाभला.
पुढे शहाबाबू हायस्कूलमधील ईसहाक राही, शमशेर खान आणि कुटुंबीयातील अँड. र्मदान अली, अल्मतश शम्स यांच्याकडून नईमला वेगळी दिशा मिळाली. सामाजिक भान जोपासत सुरू केलेल्या काव्य, गजल शेरांमुळे नईम फराज अल्पावधीतच अकोल्यातून मुंबई, दिल्ली आणि देशाबाहेरच्या थोरा- मोठय़ांच्या पंगतीत जाऊन बसला. त्याचीच पावती म्हणून आता नईम रियाध, जुबैल, दम्माम, जद्दाह या अरेबियांतील चार ठिकाणी मुशायरासाठी जात आहे. भारतीय दूतावासाने या आधी देखील घेतलेल्या या मुशायर्यात हा युवक दोहा, कतर, दुबई येथील मैफीली गाजवून आला आहे. अकोल्यातील युवा गजलकार नईम फराजचा ‘शेर’ याआधी दिल्लीच्या संसदेतदेखील गाजला आहे.
३७ वर्षीय युवा गजलकाराने घेतलेली ही झेप साहित्यक्षेत्रात करीअर घडवण्यास इच्छुक असलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.