राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा व शहर अध्यक्षांची घोषणा लांबणीवर!
By admin | Published: July 10, 2015 01:26 AM2015-07-10T01:26:42+5:302015-07-10T01:36:30+5:30
विधिमंडळ अधिवेशन काळात घोषणा होण्याची शक्यता.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नावाची घोषणा लांबणीवर पडली आहे. नागपूर येथे इच्छुकांच्या मुलाखती खुद्द माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या; मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अनुपस्थितीमुळे घोषणा लांबणीवर पडली आहे. आता १३ जुलैपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान दोन्ही अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशस्तरावरील कार्यकारिणीत बदल झाल्यानंतर जिल्हास्तरावरील कार्यकारिणी बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील ८ जिल्हे वगळता उर्वरित जिल्हय़ांमध्ये नवीन पदाधिकारी आरूढ आले आहेत. या आठ जिल्ह्यांमध्ये अकोल्याचाही समावेश आहे. अकोला जिल्हाध्यक्ष आणि महानगर अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी बुधवारी नागपुरात इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार यांनी घेतल्या. दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित मुलाखती आटोपल्या. यावेळी महानगर अध्यक्षपदासाठी पप्पू शर्मा, राजू मुलचंदानी, पापा पवार यांनी मुलाखत दिली. जिल्हाध्यक्षपदासाठी राजू बोचे, विजय देशमुख, कैलास गोंडचवर, अरविंद घोगरे, मंचितराव पोहरे आदींनी मुलाखती दिल्यात. मुलाखती आटोपल्या असल्या तरी प्रदेशाध्यक्षांच्या अनुपस्थितीमुळे नावाची घोषणा लांबणीवर पडली आहे.