राष्ट्रवादीच्या बैठकीत मनपा निवडणुकीवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:53+5:302021-04-04T04:18:53+5:30
राज्यात २०१९ मध्ये सत्तापरिवर्तन हाेऊन शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने महाविकास आघाडीचे गठन केले. सत्ता स्थापन हाेताच २४ मार्च ...
राज्यात २०१९ मध्ये सत्तापरिवर्तन हाेऊन शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने महाविकास आघाडीचे गठन केले. सत्ता स्थापन हाेताच २४ मार्च २०२० पासून सरकारने काेराेना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. या संकटातून अद्यापही शासन सावरले नसल्याचे चित्र असून राज्यात व शहरात पुन्हा काेराेना संक्रमण वाढल्याची परिस्थिती आहे. अशा संकटातून मार्ग काढत फेब्रुवारी २०२२ मध्ये हाेऊ घातलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बैठकीत सविस्तर चर्चा पार पडली. यावेळी मनपाने अकाेलेकरांवर अवाजवी करवाढ लादली असून त्यापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पक्षाने पुढाकार घेणे, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी जनता दरबाराचे आयाेजन करणे व सत्ताधारी भाजपच्या कालावधीतील घाेळ चव्हाट्यावर आणण्याच्या मुद्यावर बैठकीत एकमत झाल्याची माहिती आहे. बैठकीमध्ये महानगराध्यक्ष विजय देशमुख, नगरसेविका उषा विरक, नगरसेवक फैय्याज खान, अब्दुल रहिम पेंटर, नितीन झापर्डे, मा. गटनेता मनोज गायकवाड, मा. नगरसेवक दिलीप देशमुख, अजय रामटेके, फरीद पहेलवान, संतोष डाबेराव, नकीर खान, अफसर कुरैशी, देवानंद ताले, बुढन गाडेकर, अजय मते, हुसैन चौधरी, रवी गीते, अशोक परळीकर, सुधीर काहकर, अक्षय झटाले, याकूब पहेलवान, डाॅ. विजय वाघ, शेख जावेद आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
...फाेटाे मेल...