अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मोर्चा

By admin | Published: January 3, 2017 07:50 PM2017-01-03T19:50:06+5:302017-01-03T19:50:06+5:30

अकोल्याला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे या मागणीसाठी मंगळवार, ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मोर्चा धडकला.

NCP Student Congress Front on Akola District Collectorate | अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मोर्चा

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मोर्चा

Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.  3-  अकोल्याला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे या मागणीसाठी मंगळवार, ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मोर्चा धडकला. 
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता अशोक वाटीका येथून निघालेला हा मोर्चा दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विभाजन करण्यात यावे, अन्यथा नवीन विद्यापीठास मान्यता द्यावी, पदवी प्रमाणपत्र एकाच ठिकाणी देण्याची सोय करावी, गुणपत्रिका, परीक्षा आवेदन अर्ज एकाच ठिकाणी मिळावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क माफ करावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अविनाश चव्हाण, शैलेश बोदडे, संदीप तायडे यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते

Web Title: NCP Student Congress Front on Akola District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.