स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीकडे राष्ट्रवादीची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:51+5:302021-03-10T04:19:51+5:30
सेना,काॅंग्रेसच्या उमेदवाराला चार मते १६ सदस्यीय स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपचे संजय बडाेणे यांना १० मते मिळाली. सेना,काॅंग्रेसच्या उमेदवार प्रमीला ...
सेना,काॅंग्रेसच्या उमेदवाराला चार मते
१६ सदस्यीय स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपचे संजय बडाेणे यांना १० मते मिळाली. सेना,काॅंग्रेसच्या उमेदवार प्रमीला गीते यांना चार मते मिळाली. राकाॅंच्या गटनेत्या शितल गायकवाड व शितल रामटेके अनुपस्थित हाेत्या.
सभागृहात विराेध नाहीच!
महापालिकेच्या राजकारणात विराेधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून २९ काेटींचा शाैचालय घाेळ,अवाजवी लादलेल्या करवाढीचा मुद्दा असाे वा ‘अमृत’याेजनेच्या कामातील अनियमितता तसेच सिमेंट रस्त्यांच्या घाेळात सभागृहात चकार शब्द काढल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीतही राकाॅं चार हात दुर राहील,अशी शक्यता वर्तविली जात हाेती.
आघाडीची शक्यता धुसर
मनपाची सार्वत्रिक निवडणूक आगामी नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशास्थितीत सभापतीपदाच्या निवडणुकीतील राजकीय घडामाेडी पाहता पुढील दिवसांत सेना,काॅंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी हाेणार की नाही,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.