अकोल्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:00 PM2017-12-22T23:00:04+5:302017-12-22T23:28:12+5:30
अकोला : सांगितल्यानंतरही प्रभागामध्ये सफाई न केल्याच्या कारणावरून सफाई कामगारास शिवीगाळ करणार्या राष्ट्रवादी काँगेसच्या नगरसेविका उषा विरक व त्यांचे पती जगजितसिंह विरक यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सांगितल्यानंतरही प्रभागामध्ये सफाई न केल्याच्या कारणावरून सफाई कामगारास शिवीगाळ करणार्या राष्ट्रवादी काँगेसच्या नगरसेविका उषा विरक व त्यांचे पती जगजितसिंह विरक यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
अकोला महापालिकेचे सफाई कामगार असलेले संजय बाबूलाल बेडवाल (४९ रा. कैलास टेकडी) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते स्वराज्य भवन परिसरात काम करीत असताना, याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका उषा विरक आणि त्यांचे पती जगजितसिंह विरक आले आणि त्यांनी संजय बेडवाल यांना, प्रभागामध्ये तुला सफाई करण्यास सांगितले होते. मग तू सफाईचे काम का केले नाही. असे म्हणत, त्यांच्यासोबत वाद घातला आणि अश्लील शिवीगाळ केली. त्यांच्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिसांनी विरक दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५0६, नुसार गुन्हा दाखल केला.
सफाई कामगाराला आम्ही शिवीगाळ केली नाही. त्याने दिलेली तक्रार खोटी आहे. उलट तोच माझ्यासोबत उद्धट भाषेत बोलला. सफाई कामगार काम करीत नसेल, तर त्याला जाब विचारणे हा गुन्हा आहे का? स्वराज्य भवनमध्ये अनेक लोक साक्षीदार आहेत. मी शिवीगाळ केली नसल्याचे हे लोकसुद्धा सांगतील. हा सफाई कामगार माझ्यासोबत अर्वाच्च भाषेत बोलल्यामुळे मीसुद्धा त्याची पोलिसात तक्रार केली आहे.
- उषा विरक, नगरसेविका