राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये होणार फेरबदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:56 PM2018-04-19T13:56:06+5:302018-04-19T13:56:06+5:30

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभरातील जिल्हा कार्यकारिणींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केला जाणार आहे.

NCP's district executive will be re-shuffled! | राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये होणार फेरबदल!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये होणार फेरबदल!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी २२ एप्रिल रोजी निवडणूक. विरोधी पक्षांकडून झालेली आंदोलने सरकारवर फारसा प्रभाव टाकू शकली नसल्याचे चित्र निर्माण झाले.

- आशिष गावंडे
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभरातील जिल्हा कार्यकारिणींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केला जाणार आहे. पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून येत्या २२ एप्रिल रोजी जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडणार असून, २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आयोजित सर्वसाधारण सभेत प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आगामी जिल्हा परिषद, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षांतर्गत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
शेतकºयांच्या उत्पादित शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने सातत्याने आंदोलनांचा बिगुल फुंकल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नाफेडद्वारे तूर, सोयाबीनची खरेदी प्रक्रिया असो वा अपुऱ्या बारदान्याअभावी शेतमालाच्या होणाºया नासाडीवरून शिवसेनेने प्रशासकीय यंत्रणेसह शासनाला धारेवर धरल्याचे दिसून आले. अर्थातच, ही जबाबदारी विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची असली, तरी या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी बदललेल्या सावध भूमिकेमुळे सेनेचे फावले. विरोधी पक्षांकडून झालेली आंदोलने सरकारवर फारसा प्रभाव टाकू शकली नसल्याचे चित्र निर्माण झाले. पक्षात आलेली मरगळदेखील याचे मुख्य कारण मानल्या जाते. अशा स्थितीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतल्याचे दिसत आहे. त्या पृष्ठभूमीवर २२ एप्रिल रोजी पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाºयांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची दोन वेळा संधी मिळाली. त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २९ एप्रिल रोजी पुणे येथे आयोजित सर्वसाधारण सभेत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.


पक्षाच्या ध्येय-धोरणांमध्ये बदल?
राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या मुद्यावर भाजपाने राष्ट्रवादीला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षाने आजवर घेतलेल्या सावध पवित्र्यावर पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या ध्येय-धोरणांमध्ये बदल करण्यासह आगामी दिवसांतील रणनीती आखण्यावर भर दिला जाणार आहे.

Web Title: NCP's district executive will be re-shuffled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.