राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण विभागात विदर्भातील तिघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:41 PM2019-02-01T14:41:31+5:302019-02-01T14:41:53+5:30
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कॅडर बेस पार्टीकडे वाटचाल सुरू करण्यासाठी लोणावळा येथे झालेल्या राज्यातील २७० पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामधून राज्यातील ३० जणांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण विभागात निवड करण्यात आली आहे.
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कॅडर बेस पार्टीकडे वाटचाल सुरू करण्यासाठी लोणावळा येथे झालेल्या राज्यातील २७० पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामधून राज्यातील ३० जणांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण विभागात निवड करण्यात आली आहे. यामध्ये अकोल्यातील शरद ढगे यांची निवड झाली असून, त्यांच्यासोबतच विदर्भातील दोघांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पेनतून वक्ता प्रशिक्षण विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एक प्रशिक्षण लोणावळा-खंडाळा येथे घेण्यात आले. यासाठी राज्यातील २७० जणांना बोलावण्यात आले होते. वक्तृत्व कौशल्य आणि काही तांत्रिक बाबींवर घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये खा. सुप्रिया सुळे यांनी २७० पैकी १२० जणांची निवड केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी ६० जनांची निवड केली तर त्यामधील योग्य प्रशिक्षक आणि वक्ता असलेल्या ३० जणांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असून, यामध्ये अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव शरद ढगे यांची ३० जणांमधून निवड करण्यात आली आहे. यासोबतच अमरावती येथील प्रदीप येवले व चंद्रपूर येथील अॅड. मेघा रामगुंडे यांचीही निवड करण्यात आली आहे.