गॅस दरवाढीविराेधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:18 AM2020-12-29T04:18:04+5:302020-12-29T04:18:04+5:30
मूर्तिजापूर : गॅस दरवाढीमुळे महिलांचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. त्यामुळे ‘हेच का तुमचे अच्छे दिन’ असा सवाल उपस्थित करून ...
मूर्तिजापूर : गॅस दरवाढीमुळे महिलांचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. त्यामुळे ‘हेच का तुमचे अच्छे दिन’ असा सवाल उपस्थित करून ‘असे अच्छे दिन आम्हाला नकोच’, असे ठणकावून सांगत राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधात घाेषणा दिल्या. गॅस दरवाढीविराेधात मूर्तिजापुरात २७ डिसेंबर रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा निषेध करीत दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
आधीच कोरोनामुळे महागाई वाढली असून, अशातच आता केंद्र सरकारने गॅस दरवाढीचा निर्णय घेतला आहे. ही बाब चुकीची असून, महिला चिंताग्रस्त झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचाही काहीच फायदा झाला नसून त्यामुळे महिलांना शेवटी चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. या सर्व बाबीचा निषेध करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून घोषणा देत केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीचा निषेध केला. आंदाेलनात प्रदेश संघटक रवि राठी, महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत, ओबीसी सेल अध्यक्ष सुषमा कावरे, जिल्हाध्यक्ष उषा जामणीकर, शहराध्यक्षा सुनीता जामणीकर, ओबीसी तालुकाध्यक्षा दीपाली देशमुख, ओबीसी तालुका उपाध्यक्ष रंजना सदार, ओबीसी शहराध्यक्षा पुष्पाताई वरोकार, ओबीसी तालुका महासचिव उज्ज्वला ठाहूलकर, छाया मोरे, संजीवनी मुरकुटे, फायेमाबी, ओबीसी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर, शहराध्यक्ष राम कोरडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निजामभाई इंजिनिअर, जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर गावंडे, ओबीसी तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, ओबीसी सेल शहराध्यक्ष विशाल शिरभाते, सागर कोरडे, प्रा. एल.डी. सरोदे, अ. जावेद, अमोल लोकरे, किशोर सोनोने, सुरेंद्र वरोकार, नीलेश अव्वलवार, मुकेश अटल, अतुल गावंडे, श्रावण रणबावडे, रामेश्वर जामणीकर, बंटी जामणीकर, अनिल जामणीकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.