खरिपासाठी लागणार ६४ हजार क्विंटल बियाणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 02:00 PM2019-03-27T14:00:47+5:302019-03-27T14:01:49+5:30
अकोला: येत्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी सर्व वाणांचे बियाणे मिळून ६४२३१ क्विंटल बियाण्याची मागणी आहे.
अकोला: येत्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी सर्व वाणांचे बियाणे मिळून ६४२३१ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. बीटी कापसाच्या ७.२० लाख पाकिटांसह ८४९९० मे. टन रासायनिक खतांच्या मागणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यापैकी महाबीजकडे ३६५०३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली जाणार आहे.
खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांच्या मागणीचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या पीक पेऱ्यानुसार पेरणी झालेले क्षेत्र, त्यासाठी लागणाऱ्या बियाणे, खतांची मागणी कंपन्या, महामंडळ, शासनाकडे करण्यात आली आहे.
खरीप ज्वारीच्या पेºयात वाढ गृहीत धरून येत्या वर्षासाठी १६८८ क्विंटल ज्वारी बियाण्याची मागणी होणार आहे. त्यापैकी महाबीजकडे १२०० क्विंटल बियाण्याची मागणी आहे. बीटी कापूस पेरणीसाठी विविध कंपन्यांकडून ७ लाख २० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये बीजी-१, बीजी-२ प्रकारातील बियाण्यांचा समावेश आहे. सोयाबीनचे ४९५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. त्यापैकी ३० हजार क्विंटल बियाणे महाबीजकडून मिळणार आहे. तुरीचे ३९३५ क्विंटल बियाणे मागविण्यात आले. मूग बियाण्याची २४४५ क्विंटल मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही मागणी घटली आहे. शेतकऱ्यांकडे गतवर्षीचे शिल्लक बियाणे वापराच्या दरानुसार घट किंवा वाढ ठरविली जाते. त्यानुसार उडिदाचे बियाणे १९६६ क्विंटल लागणार आहे. त्यामध्येही घट झाली असून, गेल्यावर्षी ती मागणी २५०७ क्विंटल होती. बाजरी- ५ क्विंटल, मका-७५ क्विंटल, सूर्यफूल-३ क्विंटल, तीळ-१४ क्विंटल, संकरित कपाशी- ४ हजार क्विंटल, सुधारित कपाशी-६०० क्विंटलची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी
कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी लागणाºया प्रमाणात बियाण्यांची मागणी करण्यात आली.
महिन्यानुसार खतांची मागणी
खरीप हंगामाच्या पेरणीपासून त्यापुढे लागणाºया महिनानिहाय वापरासाठी खतांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये एप्रिल-१०१९७ मे. टन, मे-११८९९, जून-१८६९८, जुलै-१७८४८, आॅगस्ट- १६१४९, सप्टेंबर-१०१९९ मे. टन मिळून ८४९९० मे. टन खतांची मागणी आहे.
खतांच्या प्रकारानुसार नियोजन (मे. टन)
प्रकार मागणी
युरिया २४१९०
डीएपी १४७५०
एमओपी ४६९०
एसएसपी १७०१९
एनपीके २४३४१