शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:56 AM2020-01-04T11:56:26+5:302020-01-04T11:56:32+5:30

आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.

Need 74 crores more to help farmers | शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी!

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी!

Next

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनाकडून दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटपासाठी आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी एकूण ३०५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी मदत वाटपाच्या दोन टप्प्यात १३ डिसेंबरपर्यंत २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी आणखी ७३ कोटी ९० हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने तिसºया टप्प्यातील मदतीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.

दोन टप्प्यात वितरित केलेली अशी आहे मदतीची रक्कम!

जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनामार्फत दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आली.
अकोला तालुका-४३ कोटी ७९ लाख ३६ हजार रुपये, बार्शीटाकळी- २७ कोटी ४३ लाख ५८ हजार रुपये, अकोट -४१ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये, तेल्हारा -२९ कोटी ८५ लाख ८ हजार रुपये, बाळापूर -३२ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये, पातूर -२४ कोटी ५३ लाख रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी ३१ कोटी ५५ लाख ११ हजार रुपये मदतीची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईची मदत शेतकºयांना वाटप करण्यासाठी दोन टप्प्यात शासनाकडून प्राप्त मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.

 

Web Title: Need 74 crores more to help farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.