योजनांच्या माहितीसाठी जनजागृतीची गरज!

By Admin | Published: June 24, 2017 05:47 AM2017-06-24T05:47:26+5:302017-06-24T05:47:26+5:30

खासदार संजय धोत्रे यांचे प्रतिपादन : सांसद ग्राम केळीवेळीत ‘न्यू इंडिया अभियान कार्यक्रम’

Need for awareness of the schemes! | योजनांच्या माहितीसाठी जनजागृतीची गरज!

योजनांच्या माहितीसाठी जनजागृतीची गरज!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी या योजनांवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रम गरजेचे आहेत, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी सांसद आदर्श ग्राम केळीवेळी येथे केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार निदेशालय अमरावती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील श्री सखाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ह्यन्यू इंडिया अभियानह्ण, या विशेष जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पं.स. सुमित्रा जावरे, सरपंच दिनकर गावंडे, उपसरपंच महेंद्रसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार घुगे, गुरुव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. खिल्लारे, गटविकास अधिकारी कालिदास तापी, उपविभागीय कृषी अधिकारी ए. एन. कंडराकर, सहायक टपाल अधीक्षक व्ही. के. मानकर, शाकिर शेख, तालुका कृषी अधिकारी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकव्यवस्थापक तुकाराम गायकवाड, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार कार्यालय प्रमुख संजय तिवारी, सहा गटविकास अधिकारी सुधीर अरबट, योग प्रशिक्षक धनंजय भगत आणि तालुका स्तरावरील सर्व राज्य सरकारच्या कार्यालयाचे विभाग प्रमुख आणि ग्रामपंचायतचे सदस्यगण आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार धोत्रे म्हणाले, की केंद्र सरकारने गरिबांसाठी समग्र सामाजिक सुरक्षिततेचा विचार करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जीवन ज्योती आणि अटल पेन्शनसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना सामाजिक संरक्षण देण्यात येत आहे. आपल्या गावाला आदर्श गाव करण्याकरिता शासनाकडून राबवल्या जाणार्‍या योजना व उपक्रमामध्ये संबंधित अधिकारीवर्ग आणि लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अंबादास यादव, संचालन मंगेश भालेराव, आभार महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज शर्मा, ग्रामसेवक भुजंगराव शिवरकार, अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगला दोड, नेहरू युवा केंद्राचे अध्यक्ष श्रीकांत गावंडे व त्यांचे कार्यकर्ते, विशाल घोडेस्वार, ग्रामपंचायतचे कर्मचारीवर्ग, अंगणवाडी सेविका पुष्पा जंजाळ, पद्मा नातमते, नंदा वानखडे, व मदतनीस, आशाताई यांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Need for awareness of the schemes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.