शेतमालाच्या भावासाठी प्रयत्नांची गरज - माजी कुलगुरू डॉ. पुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:40 AM2017-12-30T01:40:07+5:302017-12-30T01:40:20+5:30

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. 

Need for effort of farmer's brother - Ex-Vice Chancellor Dr. Puri | शेतमालाच्या भावासाठी प्रयत्नांची गरज - माजी कुलगुरू डॉ. पुरी 

शेतमालाच्या भावासाठी प्रयत्नांची गरज - माजी कुलगुरू डॉ. पुरी 

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. अमित झनक, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. महेंद्र नागदेवे, प्रा. डॉ. डी.बी. उंदीरवाडे, नियंत्रक विद्या पवार, डॉ. प्रमोद वाकडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, प्रगतिशील शेतकरी आप्पाजी गुंजकर, कमलकिशोर धीर आदी होते. 
माजी कुलगुरू डॉ. पुरी म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशाला दोन मोठय़ा देणग्या दिल्या. स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन दिल्ली येथे घेतलं. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. शेतकर्‍यांच्या विकासासाठी ते झटले; परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे असूनही शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यावर समाधान शोधण्याची गरज आहे. प्रगल्भ तंत्रज्ञान, सोईसुविधा आहेत. उत्पादनवाढीसाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध आहे; परंतु शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी प्रगती करू शकत नाही. यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करून शेतमालाला भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, असे सांगत, डॉ. पुरी म्हणाले, बीटी कॉटन आल्यावर बघण्याचा दृष्टिकोन बदलला; परंतु येथेच आमची फसवणूक झाली. याविषयीचे चिंतन कृषी विद्यापीठांनी करायला हवे. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी.एम. मानकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. प्रदीप बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. 

पीक संरक्षण, यांत्रिकीकरणावर भर - डॉ. भाले
शेतकर्‍यांचा विकास हा कृषी विद्यापीठाचा ध्यास आहे. कृषी विद्यापीठाने पीक संरक्षण, सेंद्रिय शेती आणि यांत्रिकीकरणावर अधिक भर दिला आहे. शेतकर्‍यांना फायदेशीर ठरेल, असे नवनवीन कृषी तंत्रज्ञान, बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

Web Title: Need for effort of farmer's brother - Ex-Vice Chancellor Dr. Puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.