शंकराचार्यांच्या परिशीलनाला अधिष्ठानाची गरज - स्वानंद पुंड
By admin | Published: May 3, 2017 01:12 AM2017-05-03T01:12:01+5:302017-05-03T01:12:01+5:30
अकोला: आद्य शंकराचार्य यांच्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या विचारांच्या परिशीलनासाठी भारतीय अधिष्ठानाची गरज असल्याचे मत प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.
अकोला: आद्य शंकराचार्य यांच्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या विचारांच्या परिशीलनासाठी भारतीय अधिष्ठानाची गरज असून, यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या सृजनशील व राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याची ओळख होऊ शकत असल्याचे मत वणी येथील विद्यावाचस्पती प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.
आद्य शंकराचार्य प्रतिष्ठान अकोल्याच्या वतीने आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीवर रविवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात पुंड हे शंकराचार्यांच्या जीवन कार्यावर बोलत होते. राणी सती धामचे अध्यक्ष जगदीशप्रसाद बाछुका यांच्या अध्यक्षतेत संपन्न या व्याख्यान कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवी तात्यासाहेब वायचाळ, काकासाहेब जोशी उपस्थित होते.
प्रा.डॉ. पुंड पुढे म्हणाले, शंकराचार्यांच्या संदर्भात आज काहीही वक्तव्य केले जाते. आद्य शंकराचार्य हे अगदी आठ वर्षाच्या वयात चार वेदाचे भाष्यकार झालेत. त्यांनी आपल्या अल्पजीवनात धर्माच्या अधिष्ठानासाठी भारताच्या चार दिशेत चार शक्तिपीठे स्थापन केलीत. अगदी उत्तरेच्या पीठावर दक्षिणेच्या व्यक्तीला बसवून राष्ट्रीय एकात्मतेचा जगाला परिचय करून दिला. त्यांच्या या शैव व वैष्णव पंथीय विचारांना जोडण्याच्या प्रक्रियेमुळेच भारतात खऱ््या अर्थाने धर्म जागृत होऊन नांदू लागला असल्याचे त्यांनी सांगून धर्माची व्याख्या प्रतिपादित केली. त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी अद्वितीय कार्य केले. चार स्थापित शक्तिपीठावर चार महाकुंभाची निर्मिती केली. आज या स्थानावर कुंभमेळ्यात कोट्यवधी व्यक्ती जमा होऊन धर्मचिंतन करीत असल्याचे व्याख्यानात सांगितले. यावेळी पुंड व बाछुका यांचा सत्कार करण्यात आला. अथितीचें स्वागत काका जोशी, नंदू त्रिवाड, अमोल पाटील, गिरीश बावणे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. महेश मोडक यांनी तर आभार काकासाहेब जोशी यांनी मानले.