औषधं हवी? पानटपरी, किराणा दुकानावर चला!

By admin | Published: September 25, 2014 03:01 AM2014-09-25T03:01:55+5:302014-09-25T03:01:55+5:30

अकोला ग्रामीण भागातील वास्तव उघडकीस, सर्वसामान्यांचा जीव धोक्यात.

Need medication? Pantapri, go to the grocery store! | औषधं हवी? पानटपरी, किराणा दुकानावर चला!

औषधं हवी? पानटपरी, किराणा दुकानावर चला!

Next

सचिन राऊत / अकोला
जिल्हय़ात कुठेही आणि केव्हाही ज्या प्रमाणे खरमुरे-फुटाण्यांची विक्री होते त्याचप्रमाणे किराणा दुकान व पानटपर्‍यांमधून जीवघेण्या औषधांची सर्रास आणि खुलेआम विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातील किराणा दुकान व राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यानजीक असलेल्या काही पानटपर्‍यांमध्ये या घातक औषधांची विक्री सुरू असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. या दुकानदारांना औषधांचा पुरवठा करणार्‍या होलसेलर्स औषध विक्रेत्यांनाही प्रशासनमधील अधिकार्‍यांचेच पाठबळ असल्याची माहिती आहे.
औषध खरेदी किंवा विक्री चुकीची झाल्यास त्याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत असून, त्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संवेदनशील विषय असल्याने औषध विक्री आणि खरेदी करण्यासाठी शासनाने नियमावली ठरवून दिली. तसा कायदाही करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात आली आहे. औषध विक्री करण्यासाठी ड्रग अँण्ड कॉस्मेटिीस अँक्ट १९४0 च्या कलम ६५(२)नुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक आहे. यासोबतच रजिस्टर्ड फार्मासिस्टची उपस्थिती व डॉक्टरच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्याचा कायदा करण्यात आला आहे. मात्र या कायद्याला जिल्हय़ातील किराणा दुकानदार व पानटपर्‍यांवर पायदळी तुडविण्यात येत आहे. किराणा दुकानदार व पानटपर्‍यांवर खुलेआम औषधांची विक्री करण्यात येत असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. मात्र किराणा दुकानदार व पानटपर्‍यांवर मिळणारे औषध विनादेयकानेच खरेदी व विक्री करण्यात येत असून याकडे, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
जिल्हय़ात कुठेही पानटपरी व किराणा दुकानातून औषधांची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. असा प्रकार होत असल्यास तो गंभीर असून, सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. औषधांची पानटपरी व किराणा दुकानातून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. होलसेलर्स औषध विक्रेत्यांवरही यापुढे नजर ठेवण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे प्रभारी सह आयुक्त एच वाय मेतकर यांनी सांगीतले.

Web Title: Need medication? Pantapri, go to the grocery store!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.