कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:48 PM2019-05-20T12:48:59+5:302019-05-20T12:49:04+5:30

कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाºया परिणामाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे, असा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कीटकनाशके व तणनाशके बौद्धिक कार्यशाळेत काढण्यात आला.

Need to study the effects o Pesticides on land and crops | कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आवश्यक

कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आवश्यक

googlenewsNext

अकोला : कृषीमध्ये कीटकनाशके व तणनाशके यांचा शाश्वत पीक उत्पादन वाढीसाठी योग्य वापर करावा आणि त्यांच्या वापरामुळे हानी होणार नाही, याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. शिवाय, कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाºया परिणामाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे, असा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कीटकनाशके व तणनाशके बौद्धिक कार्यशाळेत काढण्यात आला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान केंद्र नवी दिल्ली यांच्यातर्फे १५ मे रोजी कीटकनाशक नोंदणी व नियम तसेच उत्पादन सुरक्षितता, शाश्वतता आणि मार्गदर्शक या विषयावर बौद्धिक कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. यावेळी कृषी वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आय. सी. ए. आर. नवी दिल्लीचे माजी सहायक संचालक डॉ. पी. के. चक्रवर्ती, डॉ. देबब्राता कानुनगो, दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान केंद्राचे संचालक डॉ. भगीरथ चौधरी, सुभाष नागरे, डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत गणेश नानोटे, विजय इंगळे, मोहन सोनवणे, दिनकर आगळे यांच्यासह विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख तसेच विरष्ठ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तीन तांत्रिक सत्रामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या सत्रात कीटकनाशके नोंदणीकरण व नियम या विषयांतर्गत डॉ. चक्रवर्ती यांनी भारतामध्ये कीटकनाशकांच्या वापराचा सर्वसामान्य आढावा सादर करण्यात आला. डॉ. पी. एस. चांदुरकर यांनी भारतातील कीटकनाशकांची नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले. डॉ. देबब्राता कानुनगो यांनी कीटकनाशकांमुळे मानवी आरोग्याची जोखीम या विषयावर सादरीकरण केले. कीटकनाशके सुरक्षित वापरण्याची पद्धती व कीटकनाशके वापराच्या मर्यादा यासंदर्भात शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. आभार डॉ. राजेंद्र काटकर यांनी मानले.

 

Web Title: Need to study the effects o Pesticides on land and crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.