अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापर काळाची गरज - गांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:13 AM2017-11-11T01:13:35+5:302017-11-11T01:13:56+5:30
पारंपरिक ऊर्जा स्रोतासोबतच आता नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जा स्रोत याचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तेवढेच महत्त्वाचे असून, तेव्हाच याची जनजागृती, प्रसार होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. चित्तरंजन गांगडे यांनी शुक्रवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पारंपरिक ऊर्जा स्रोतासोबतच आता नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जा स्रोत याचा वापर करणे काळाची गरज आहे. त्यासाठी या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तेवढेच महत्त्वाचे असून, तेव्हाच याची जनजागृती, प्रसार होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. चित्तरंजन गांगडे यांनी शुक्रवारी केले.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) दिल्ली पृरस्कृत नवनीतम ऊर्जा व संवर्धन या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयात आयोजित दहा दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाचा समारोप १0 नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यावेळी डॉ. गांगडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी याच कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. टाले होते. प्रशिक्षण संचालक डॉ. सुरेंद्र काळबांडे, महावितरणचे माजी मुख्य अभियंता आर.एस. खंडागळे यांची प्रमुख उपिस्थती होती.
डॉ. गांगडे यांनी आपल्याकडे नैसर्गिक संसाधने विपुल असल्याचे सांगत त्याचा उपयोग करू न अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करणे गरजेचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागाने यावर भरपूर काम केले असून, बॉयोगॅस, सोलर ड्रायर असे अनेक तंत्रज्ञान नागरिकांना दिले. या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण घेऊन या विषयाची धुरा घेतली असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. टाले यांनी नवनीतम ऊर्जा स्रोताचा वापर करणे आवश्यक असून, गरजेनुरू प संशोधन महत्त्वाचे आहे. त्याचे महत्त्वही त्यांनी पटवून सांगि तले. राष्ट्रीय प्रशिक्षणात देशातील पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना, बिरसा कृषी विद्यापीठ झारखंड आदींसह देशातील २५ शास्त्रज्ञांनी सहभाग घे तला. समारोपाला डॉ. महेंद्र देशमुख, डॉ. सूचिता गुप्ता, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. विवेक खांबलकर, डॉ. धीरज कराळे आदींसह कृषी अभियांत्रिकीच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. खांबलकर तर आभार डॉ. पाटील यांनी केले.