'नीट' मध्ये अकोल्याची दिशा मुलींमधून राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 06:04 PM2019-06-05T18:04:42+5:302019-06-05T18:05:42+5:30
अकोला : नीट परीक्षेत आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा समर अग्रवाल मुलींमधून बाजी मारली आहे.
अकोला : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अकोल्यातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा समर अग्रवाल मुलींमधून बाजी मारली आहे. दिशा हिने खुल्या प्रवर्गातून ४२ वी रँकींग मिळवली आहे.
यंदाच्या नीट परीक्षेत अकोल्यातील दिशा अग्रवाल या विद्यार्थीनीने एकुण ६८५ गुण मिळवत मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. खुल्या प्रवर्गातून ती ४२ व्या रँकींगवर असून तीची सर्वसाधारण रँकींग ५२ आहे. सुरुवातीपासूनच दिशा अभ्यासात हुशार असून, यापूर्वी दिशाची निवड बायोलॉजी आॅलंपीयाड आणि किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेसाठी निवड झाली होती.
महाराष्ट्रात सार्थक भट याने प्रथम आणि देशात सहावा क्रमांक मिळवल आहे. सार्थकला ६९५ गुण मिळाले आहेत. राज्यात साईराज माने याने दुसरा तर सिद्धार्थ दाते याने तिसरा पटकावला. मुलींमध्ये देशात तेलंगणा येथील माधुरी रेड्डी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर दिशा अगरवाल हिने महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेस महाराष्ट्रातून २ लाख १६ हजार १७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ६ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यात ८१ हजार १७१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशभरातून नीट परीक्षेसाठी १४ लाख १० हजार ७५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७ लाख ९७ हजार ४२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. २०१८मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५६. २७ एवढी होती. यंदा हा टक्का ५६.५० पर्यंत वाढला आहे.