कोरोनाच्या सावटात १९ केंद्रांवर उद्या 'नीट' परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 07:53 PM2020-09-12T19:53:54+5:302020-09-12T19:54:02+5:30
सात हजारावर विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत.
अकोला : इयत्ता बारावीची परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्र शासनाने जेईई व एनईईटी (नीट) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या सावटात आता जिल्ह्यातील १९ परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा होणार आहे. सात हजारावर विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. अकोट येथेही नीट परीक्षेसाठी तीन केंद्र देण्यात आले आहेत.
नीट परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या परीक्षेविषयी सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता; परंतु केंद्र शासनाने नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रभात किड्स स्कूल, शिवाजी महाविद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, स्कूल आॅफ स्कॉलर्स, एलआरटी वाणिज्य महाविद्यालय, माउंट कारमेल स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सीताबाई कला महाविद्यालय, मानव स्कूल आॅफ इंजिनिअरिंग, रादेगो महिला महाविद्यालय, नोएल स्कूल, समर्थ पब्लिक स्कूल, जसनागरा पब्लिक स्कूल, आरएलटी विज्ञान महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय, भिकमचंद्र खंडेलवाल विद्यालय आदी १९ केंद्रांवर नीट परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शिक्षण विभाग व जिल्हा प्रशाासनाने नियोजन केले आहे.