एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा शिकवणी वर्गांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:19 AM2021-03-17T04:19:18+5:302021-03-17T04:19:18+5:30
अकोला - जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी ...
अकोला - जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायम शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केलेआहे. हे आदेश बुधवार 17 पासून लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सीईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायम शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देताना कोविड-19 संदर्भात लक्षणे नसल्यास प्रवेश देण्यता यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्यास प्रवेश देण्यात येऊ नये. कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव रोखण्यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. असे स्पष्ट केले आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त पथकाचे गठन करुन आवश्यक ती तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे.
अटी व शर्ती याप्रमाणे -
1) खाजगी कोचिंग क्लास, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था सकाळी नऊ ते
सायंकाळी पाच या कालावधीतच सुरु ठेवता येतील.
2) खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण संस्था यांनी त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करतांना प्रत्येक बॅचमध्ये नियमित आसन क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचच्या मध्ये अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल व रुमचे तसेच तदनुषंगिक साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
3) विद्यार्थ्याच्या पालकांचे संमती पत्र प्राप्त करुन घेणे बंधनकारक राहील.
4) प्रशिक्षण देणाऱ्या आस्थापनेतील सर्व संबंधितांचे तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील.
मास्कचा वापर एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.
५) सराव करतांना दारे, खिडक्या उघडी ठेवण्यात यावी तसेच ए.सी. चा वापर टाळण्यात यावा.