नवथळ येथे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:41+5:302020-12-06T04:19:41+5:30

नवथळ गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परितवाडा, खेकडी, असे एकूण तीन गावे समाविष्ट असून, या गावाला सन २००७ मध्ये माजी ...

Neglect of government employees at Navthal, citizens distressed | नवथळ येथे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

नवथळ येथे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

Next

नवथळ गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परितवाडा, खेकडी, असे एकूण तीन गावे समाविष्ट असून, या गावाला सन २००७ मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ग्राम निर्माण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; परंतु सन २०१५ पासून गावात पोलीस पाटील पदसुद्धा रिक्त आहे. गावात पोलीस कर्मचाऱ्यांशिवाय तसेच रेशन धान्य दुकानदाराशिवाय कुणीच फटकत नसल्यामुळे नागरिकांना तलाठी, कृषी अधिकारी, आरोग्यसेवक, पोस्टमन अशा विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. शासनाने जनतेच्या सेवेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे; परंतु या गावात कोणताच शासकीय कर्मचारी येत नसल्यामुळे गावातील जनता त्रस्त झाली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नवथळ ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Neglect of government employees at Navthal, citizens distressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.