नेट कॅफे संचालकांची परवान्यासाठी धावाधाव
By admin | Published: December 4, 2014 01:37 AM2014-12-04T01:37:05+5:302014-12-04T01:37:05+5:30
पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन.
अकोला: इंटरनेट कॅफेच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडत असून, नेट कॅफे संचालक सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहेत, याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करताच शहरातील नेट कॅफे संचालकांनी बुधवारी परवान्यासाठी धावपळ केली. नेट कॅफे संचालकांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन देऊन परवाना तातडीने देण्याची मागणी केली.
सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत असून, या गुन्हय़ामध्ये अकोला राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. हे गुन्हे वाढण्यास नेट कॅफेही बहुतांश प्रमाणात जबाबदार असल्याचे समोर आल्याने सीआयडीने नेट कॅफेवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
यासोबतच नेट कॅफे संचालकांना एक नियमावली ठरवून दिली असून, यानुसारच नोंद ठेवणे व इतर नियम दिले आहेत. मात्र काही इंटरनेट कॅफेवर याबाबत दक्षता पाळण्यात येत नसल्याचे ह्यलोकमतह्णने मंगळवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले. या वृत्ताची दखल घेत आरटीओ रोड, गोरक्षण रोड, कौलखेड रोडसह या परिसरातील नेट कॅफे संचालकांनी तातडीने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.